सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी; तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:03 PM2021-09-05T12:03:25+5:302021-09-05T12:11:15+5:30
Corona Vaccination : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात. आता कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी मंडळही पूढे सरसावली आहेत.
कल्याण - कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. गणरायाचं आगमन देखील लवकरच होणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांचे लसीकरण करता येऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी डोंबिवलीकर युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात. आता कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी मंडळही पूढे सरसावली आहेत. कल्याणडोंबिवलीतील काही नागरिक अद्यापही लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. हा विचार करता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मंडपाशेजारी लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी युवासेनेचे पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी केली आहे.
प्रत्येक प्रभागात गणेश मंडळाचं कार्य सुरू असतं. त्यामुळे गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळाली तर मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण होऊन भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यात मोठी मदत होईल असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी महानगरपालिकेने लससाठा उपलब्ध करून दिल्यास शासनाच्या 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात मोठा हातभार लागू शकेल असही ते म्हणाले.
CoronaVirus Live Updates : कोरोनामुळे देशभरात तब्बल 4 लाख लोकांना गमवावा लागला जीव#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19Indiahttps://t.co/bRDIwDhaaf
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2021