कल्याणमधूनही पीएफआय कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात, चाैकशी सुरु
By मुरलीधर भवार | Published: September 27, 2022 01:07 PM2022-09-27T13:07:48+5:302022-09-27T13:08:18+5:30
कल्याण - कल्याणमधील पी एफ आय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाईं ...
कल्याण- कल्याणमधील पी एफ आय कार्यकर्ता फरदीन पैकरला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाईं करत ताब्यात घेतले आहे . फरदीन हा रोहिदास वाडा परिसरात राहतो. आज पहाटेच्या सुमारास फरदीनला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. ,दरम्यान फरदीन ने कोणतेही चुकीचं कृत्य केलं नाही, आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे .
देशभरात पी एफ आय या संघटनेविरोधात देशातील सुरक्षा यंत्रणेने कारवाई सुरू केली आहे . आज पहाटेच्या सुमारास ठाणे खंडणी विरोधी पथक आणि बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पीएफआय कार्यकर्ता फरदीन पैकर याला ताब्यात घेतलं. फरदीन आपली पत्नी व आईसह रोहिदास वाडा परिसरात आझाद चाळीत राहत हाेता. अनेक वर्षांपासून या परिसरात तो सामाजिक कार्य करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. बाजारपेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली या चौकशीत काय निष्पन्न होत याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईबाबत फरदिनचा भाऊ फरहान यांनी सांगितेल की, फरदिन याने काही चुकीचं काम केलेलं नाही सध्या तो सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट साठी काम करत होता. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे आम्हाला योग्य न्याय मिळेल अस सांगितले.