जयंती शिवरायांची, शिवसेना शहरप्रमुखांनी बॅनरवर छापला छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:35 AM2022-03-23T07:35:59+5:302022-03-23T07:36:57+5:30

बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना शहरप्रमुख अशी महत्त्वाची पदे दिली की असा गोंधळ होतो; भाजप आमदाराचा टोला

Photo of Sambhaji maharaj printed on banner instead of Shivaji Maharaj by shiv sena leader | जयंती शिवरायांची, शिवसेना शहरप्रमुखांनी बॅनरवर छापला छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो

जयंती शिवरायांची, शिवसेना शहरप्रमुखांनी बॅनरवर छापला छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो

googlenewsNext

डोंबिवली: शिवजयंतीनिमित्त शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेतर्फे सोमवारी लावलेल्या काही होर्डिंग्जवर छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो छापल्याचे निदर्शनास येताच भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना शहरप्रमुख अशी महत्त्वाची पदे दिली की असा गोंधळ होतो. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्याबाबत जरा लक्ष घालावे, असे आवाहन करून त्यांनी टीका केली. त्यावर मंगळवारी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार चव्हाण यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्या बॅनरवर नजरचुकीने छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो लागला होता, ती वस्तुस्थिती असून त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितले.

चव्हाण यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्याबाबत दाखला देताना उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात ते  स्वतः महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करताना त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते, त्याचा बहुधा त्यांना विसर पडला असावा, याचीही मोरे यांनी आठवण करून दिली.
शहरप्रमुखपदी कोणाला बसवायचे हा शिवसेना पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेने शिवजयंतीनिमित्त काढलेली न भूतो अशी मिरवणूक बघून त्यांच्या पायांखालची वाळू सरकली असावी. आमच्या रक्तात हिंदुत्व असून त्यांनी आम्हाला ते शिकवू नये, असेही ते म्हणाले. तसेच भाजपने कधी शिवजयंती साजरी केलेली आपण पाहिले नाही. बॅनर लावले नाही. त्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. 

मोरे हे मूळचे शिवसैनिक नाहीत
मोरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्या पक्षातून ते दत्तनगर भागातून महापालिका निवडणुकीत निवडूनही आले होते. 
त्यानंतर २००९ दरम्यान ते शिवसेनेत आले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत मोरे दाम्पत्याने निवडणूक जिंकली. त्यानंतर ते महापालिका सभागृह नेते झाले.
पाठोपाठ त्यांना पक्षाने शहरप्रमुख ही जबाबदारी दिली. मोरे हे मूळचे शिवसैनिक नसून ते बाहेरून आले आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली. 

Web Title: Photo of Sambhaji maharaj printed on banner instead of Shivaji Maharaj by shiv sena leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.