डोंबिवलीतील पाळणाघरात मुलांचा शारीरीक आणि मानसिक छळ, व्हिडिओतून धक्कादायक प्रकार उघड

By मुरलीधर भवार | Published: March 20, 2024 03:15 PM2024-03-20T15:15:29+5:302024-03-20T15:16:17+5:30

तीन जणां विरोधात गुन्हा दाखल

Physical and mental torture of children in a nursery in Dombivli, shocking video reveals | डोंबिवलीतील पाळणाघरात मुलांचा शारीरीक आणि मानसिक छळ, व्हिडिओतून धक्कादायक प्रकार उघड

डोंबिवलीतील पाळणाघरात मुलांचा शारीरीक आणि मानसिक छळ, व्हिडिओतून धक्कादायक प्रकार उघड

डोंबिवली -डोंबिवलीत एका पाळणा घरात लहान मुलांचा शारीरीक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ््याने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. आधी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. नंतर पाळणाघर चालविणाऱ््या पती पत्नीसह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या व्हिडिओत लहान मुलांना बांधून ठेवणे, त्यांना उलटे करणे. त्यांना मारहाण करुन भिती दाखविणे हे धक्कादायक प्रकार दिसत आहेत.

डोंबिवलीत हॅपी किड डे केअर हे पाळणा घर आहे. डोंबिवलीत राहणारे मंदार आेगले आणि त्यांची पत्नी अनुजा आणि तीन वर्षाची मुलगी गार्गी सोबत राहतात. मंदार हे सरकारी गाडीवर चालक आहेत. त्यांची पत्नी अनुजा ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दोघेही सकाळी सात ते रात्री आठ वेळेत कामावर जातात. त्यांच्या घरी त्यांची मुलगी गार्गी हिची काळजी घेण्यासाठी कोणी नसल्याने ते त्यांची गार्गी हिला हिला हॅपी किड डे केअर या पाळणा घरात ठेवतात. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांनी मंदार यांना सांगितले की, ज्या पाळणा घरात तुम्ही तुमच्या मुलीला ठेवतात. त्या मुलीसोबत काय प्रकार घडतो. त्याचा व्हीडीआे आमच्या हाती आला आहे. तत्काळ मंदार यांनी कविता गावंड यांच्याशी संपर्क साधला. शिवसेना महिला पदाधिकारी यांच्यासोबत मंदार आणि अन्य पालकांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. आधी चाईल्ड वेलफेअर कमिटीला जाऊन तक्रार द्या नंतर पाहू असे सांगितले. तक्रार दाखल करुन घेतली नसल्याने हे प्रकरण सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्याकडे गेले. हा प्रकार ऐकून सहाय्यक आयुक्त कुराडे यांनी या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेश रामनगर पोलिसांना दिले. पोलिसांनी पाळणाघर चालविणारे गणेश प्रभूणे, त्यांची पत्नी आरती प्रभूणे आणि त्याठिकाणी काम करणारी राधा नाखरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण साधना सामंत या महिलेच्या पुढाकाराने समोर आले आहे. साधना सामंत ही महिला १ मार्च ला या पाळणा घरात कामाला लागली होती. तिने मुलांसोबत होत असलेला प्रकार पाहून व्यथीत झाली. तिने पाळणा घरात काम न करण्याचे ठरविले. तसेच हा प्रकार मुलांच्या पालकांपर्यंत कसा पोहचेल याची सुरुवात केली. त्यासाठी तिने पाळणा घरात होत असलेल्या मुलांचा छळवणूकीचा व्हिडिओ काढला होता.
 

Web Title: Physical and mental torture of children in a nursery in Dombivli, shocking video reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.