कल्याण तालुक्यात वनविभागाच्या वतीने फळझाडांचे वृक्षारोपण

By सचिन सागरे | Published: June 5, 2024 05:03 PM2024-06-05T17:03:49+5:302024-06-05T17:06:00+5:30

याच अनुषंगाने कल्याण तालुका वन अधिकारी राजेश चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील वनपरिक्षेत्रात सुमारे शंभर फळझाडे लावण्यात आली. त्यामध्ये काजू जांभूळ, आंबा, फणस, आवळासह अन्य झाडांचा समावेश करण्यात आला होता. खडवली वनपरिक्षेत्र कार्यालय, दहागाव, कुंदे, कल्याण आदी वनपरिक्षेत्रात ही फळझाडे लावण्यात आली.

Plantation of fruit trees on behalf of Forest Department in Kalyan Taluk | कल्याण तालुक्यात वनविभागाच्या वतीने फळझाडांचे वृक्षारोपण

कल्याण तालुक्यात वनविभागाच्या वतीने फळझाडांचे वृक्षारोपण

कल्याण : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कल्याण तालुका वनविभागाच्या वतीने फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.

याच अनुषंगाने कल्याण तालुका वन अधिकारी राजेश चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील वनपरिक्षेत्रात सुमारे शंभर फळझाडे लावण्यात आली. त्यामध्ये काजू जांभूळ, आंबा, फणस, आवळासह अन्य झाडांचा समावेश करण्यात आला होता. खडवली वनपरिक्षेत्र कार्यालय, दहागाव, कुंदे, कल्याण आदी वनपरिक्षेत्रात ही फळझाडे लावण्यात आली.

यावेळी वन अधिकारी राजेश चन्ने, खडवली वन अधिकारी अभिमन्यु जाधव, वनरक्षक संजय शिंदे, वनरक्षक संजय हांडे, मंज्या गायकवाड, सारिका सानप आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. पर्यावरण समतोल राखले पाहिजे, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने झाडे लावली पाहिजेत व ती झाडे जगवली पाहिजेत असे आवाहन वन अधिकारी चन्ने यांनी केले.
 
Web Title: Plantation of fruit trees on behalf of Forest Department in Kalyan Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण