गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील; शिंदे पिता पुत्रांवर उद्धव ठाकरे यांची टीका
By मुरलीधर भवार | Published: January 13, 2024 01:21 PM2024-01-13T13:21:39+5:302024-01-13T13:22:55+5:30
उद्धव ठाकरे आज कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत.
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याणमध्ये काय होणार ? घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील. म्हणजे वापरा आणि फेका . हे धोरण. हे गद्दार कचऱ््याच्या टोपलीत जाणार. नाही गेले तर आपण आहोतच कचऱ््याच्या टोपलीत टाकायला अशी टिका शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता पुत्रावर केली आहे.
उद्धव ठाकरे आज कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ््याची सुरुवात कल्याण ग्रामीणमधील देसाई गावातील शिवसेना शाखेतून करण्यात आली. या प्रसंगी ठाकरे यांनी टिका केली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. कल्याण लोकसभा संघात ॰ीकांत शिंदे हे खासदार आहे. शिवसेना पक्ष फूटीनंतर ठाकरे हे प्रथमच कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करीत आहेत. त्यांच्या दौऱ््याची सुरुवात देसाई गावातील शाखेतून घेतली. देसाई गावातील शाखेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, आपण पाहिले असेल तर या मतदार संघातील जबाबदारी येणाऱ््या लोकसभा निवडणूकीत महत्वाची आहे. मी या दौऱ््याला सुरुवात करण्या आधी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मी पत्रकारांना सांगितेल की, त्यांना सांगितले की, गद्दार घराणे शाहीच्या मुळावर घाव घालण्यासाठी चाललो आहे. काल आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन. माझ्या माहिती प्रमाणे ते पुन्हा एकदा ते येणार आहेत. उद्या मकर संक्रात आहे. तिळगूळ वाटप सुरु आहे. तिळगूळ घ्या गोडगोड बोला. या लोकसभेच्या निवडणूकीत हुकूमशाहीवर संक्रात येणार असे ठाकरे यांनी सांगितले.
देसाई गावातील सिताराम भोईर यांनी शिवसेना सोडून गेलेल्या गणेश नाईक यांचा पराभव केला होता. एक सामान्य शिवसैनिक काय करु शकतो हे तुम्हाला माहितच आहे. देसाई शाखेचा हा इतिहास आहे. त्याचीच पुनर्रावृत्ती येत्या लोकसभा निवडणूकीत होणार हे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी ठाकरे यांचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले.