पोलीस शिपाई गामणे यांचा हृदयविकाराने मृत्यू
By सचिन सागरे | Published: February 26, 2024 04:42 PM2024-02-26T16:42:17+5:302024-02-26T16:42:48+5:30
गामणे रविवारी रात्री बडी रात बंदोबस्त करिता कर्तव्यावर हजर होते. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास तब्येतीच्या कारणास्तव अस्वस्थ वाटत असल्याने घरी गेले होते.
कल्याण : महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे नेमणुकीतील पोलीस शिपाई रामेश्वर राजाराम गामने (३९, रा. चिंचपाडा, कल्याण) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गामणे रविवारी रात्री बडी रात बंदोबस्त करिता कर्तव्यावर हजर होते. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास तब्येतीच्या कारणास्तव अस्वस्थ वाटत असल्याने घरी गेले होते. सकाळी सातच्या सुमारास त्यांना उलटी व मळमळ त्रास जाणवू लागला. त्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते काहीच बोलत नाही म्हणून त्यांच्या पत्नी वंदना यांनी नातेवाईकांना बोलावून गामणे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी गामणे यांना मयत घोषित केले.
गामणे यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.