पाेलिसांनी गाडी चावी लाऊन उभी केली होती आणि तो अलगदच सापडला जाळ्यात

By मुरलीधर भवार | Published: February 16, 2024 05:22 PM2024-02-16T17:22:32+5:302024-02-16T17:23:39+5:30

अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागडा गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

police had parked the car with the key and he was found alone in the net in kalyan | पाेलिसांनी गाडी चावी लाऊन उभी केली होती आणि तो अलगदच सापडला जाळ्यात

पाेलिसांनी गाडी चावी लाऊन उभी केली होती आणि तो अलगदच सापडला जाळ्यात

मुरलीधर भवार, कल्याण : अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागडा गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाढत्या वाहन चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व परिसरात कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी एका गाडीला चावी लावून ती गाडी उभी केली होती. हा संशयित चोरटा ती गाडी चालू करण्यासाठी गेला असता पोलिसांच्या पथकाने झडप घालत त्याला अटक केली आहे . चिन्मय तलावडे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकी, एक होंडा सिटी कार जप्त केली आहे.

वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण कोळशेवाडी पोलिसांना या चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ , सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलीसांच्या पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी कल्याण पूर्व परिसरात सापळा रचला. कल्याण पूर्व परिसरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी एक दुचाकी चावी लावून उभी केली होती . 

एक संशयीत इसम त्या ठिकाणी आला. बाईकला चावी लागलेली पाहताच त्याने बाईक चोरण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांच्या पथकाने तात्काळ झडप घालत या चोरट्याला अटक केली. चौकशी दरम्यान त्याचे नाव चिन्मय तलावडे असल्याचे समोर आले. चिन्मय हा अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या आणि दुचाकी चोरी करीत होता. त्याने या आधी देखील अशाच प्रकारे अनेक बाईक चोरी केल्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. कोळशेवाडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Web Title: police had parked the car with the key and he was found alone in the net in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.