पोलिसांनी मिळवून दिले रिक्षात विसलेले लाखो रुपयांचे दागिने; सीसीटीव्हीच्या माध्यमाने घेतला शोध
By मुरलीधर भवार | Published: December 31, 2022 05:37 PM2022-12-31T17:37:54+5:302022-12-31T17:39:35+5:30
रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने रिक्षाचा शोध घेत रिक्षा चालकाकडून पाच लाखाचे दागिने आणि रोकड हस्तगत गेली आहे. रामनगर पोलिसांकडून हे दागिने संबंधितांना परत करण्यात आले आहेत.
डोंबिवली- रिक्षा प्रवासादरम्यान आई आणि मुलगा दागिन्याने भरलेली बॅग रिक्षात विसरले. पाच दिवस उलटूनही दागिने परत मिळाले नाही. अखेर रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने रिक्षाचा शोध घेत रिक्षा चालकाकडून पाच लाखाचे दागिने आणि रोकड हस्तगत गेली आहे. रामनगर पोलिसांकडून हे दागिने संबंधितांना परत करण्यात आले आहेत.
डोंबिवली पूर्व भागातील राजाजी पथ परिसरात राहणारे प्रकाश कुमार त्यांच्या आई सोबत बँगलोरला गेले होते. २५ डिसेंबर रोजी ते पुन्हा डोंबिवलीत परतले. डोंबिवली पूर्व भागातील स्टेशनहून त्यांनी घरी जाण्याकरीता रिक्षा पकडली. त्यांच्याकडील बँगेत दागिने आणि रोकड होती. घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्यांची बँग रिक्षात विसरली आहे. प्रकाश कुमार हे रिक्षाच्या मागे पळाले. मात्र रिक्षा चालक निघून गेला. दागिने रिक्षात राहिल्याची तक्रार प्रकाश यांनी रामनगर पोलिस ठाण्यात दिली.
अखेर पाच दिवसानंतर रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचीन सांडभोर आणि पोलिस कर्मचारी शिवाजी राठोड आणि विशाल वाघ यांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने ती रिक्षा शोधून काढली. रिक्षाचा चालकाचा शोध घेतला. रिक्षा चालकाच्या घरी दागिन्याची बॅग सापडली. पोलिसांनी प्रकाश कुमार यांना पाच लाख ४ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड परत केली आहे. पोलिसांच्या या कामागिरीचे कौतूक होत आहे.