कल्याणच्या टीएलआर कार्यालयात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु
By मुरलीधर भवार | Published: February 27, 2024 03:15 PM2024-02-27T15:15:01+5:302024-02-27T15:15:12+5:30
चार दिवसापूर्वी केडीएमसीची दोन अधिकारी राजेश बागूल आणि बाळू बहिराम यांना अटक करण्यात आली होती.
कल्याण- बोगस कागदपत्रांची शहानिशा न करता बांधकाम परवानगी दिल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. आत्ता या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी कल्याण भूमी अभिलेखा विभागात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. कार्यालयातील नकाशा, त्या साठी लागणारे स्टॅम्प आणि इतर साहित्याचा वापर झाला आहे का ? याचा तपास पोलिस करीत आहेत.
कल्याण बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कडलक यांचे पथक कल्याण टीएलआर कार्यालयात दाखल झाले पोलिसांना पाहताच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे धाब दाणाणले . वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कडलक यांनी मुख्य अभिलेखा अधिकारी नितीन साळूंखे यांना कार्यालयात सर्च करण्याकरीता वॉरंट त्यांच्या हाती दिले. साळूंखे याना आधी काही समजले नाही. नंतर त्यांना सांगितले गेले की, कागद वाचून पाहा. पोलिसांनी सांगितले की, कार्यालयातील काही साहित्याची चौकशीची करणार आहोत. यानंतर कार्यालयातील पहिला आणि दुसरा मजल्यावरील दस्ताऐवजाची पडताळणी सुरु केली.
चार दिवसापूर्वी केडीएमसीची दोन अधिकारी राजेश बागूल आणि बाळू बहिराम यांना अटक करण्यात आली होती. केडीएमसी नगररचना विभागातील या दोन अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी न करता बांधकाम परवानगी दिली. कल्याण टीएलआर कार्यालयील दस्ताऐवज आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात टीएलआर कार्यालयातील कोण सामिल आहे. स्ट’म्प आणि कागदपत्रे या अधिकाऱ््याना कशी मिळाली , केडीएमसीचे आणखीन किती यात अधिकारी सामिल आहेत. याचा तपास पोलिस करीत आहेत.