महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचाली, शरद पवारांचा मास्टर स्ट्राेक; राजू पाटील यांचे वक्तव्य
By मुरलीधर भवार | Published: May 2, 2023 09:20 PM2023-05-02T21:20:16+5:302023-05-02T21:20:41+5:30
मनसे आमदार पाटील याच्या हस्ते आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील मनसेच्या शाखे शुभारंभ करण्यात आले.
कल्याण- आज शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरुन पायउतार हाेण्याची घाेषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या घटनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या राजकीय हालचाली थांबविण्याकरीता शरद पवार यांचा हा मास्टर स्टाेक असावा असे वक्तव्य मनसे आमदार पाटील यांनी केले आहे.
अजित पवार यांच्या बाबतीत सुरु असलेल्या चर्चेनंतर शरद पवार यांनी जाे निर्णय घेतला आहे. त्यावर मनसे आमदार पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज शरद पवार याच्यावरील लाेक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात पवार यांनी हा निर्णय जाहिर करताच राजकारणात एकच खळबळ माजली आणि विविध राजकीय चर्चांना उधाण आले.
मनसे आमदार पाटील याच्या हस्ते आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील मनसेच्या शाखे शुभारंभ करण्यात आले. कल्याण डाेंबिवली महापालिका निवडणूकीत मनसे काेणाशी हातमिळवणी करणार का असा सवाल पाटील यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, अजिबात नाही. आम्ही आत्तापर्यंत काेणाशीही हातमिळवणी केलेली नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आम्हाला तसे आदेशही नाही. कार्यकर्त्यांची भावना आहे की स्वतंत्रपणे निवडणूका लढवावी. कल्याण डाेंबिवलीचा विचार केल्यास एक वेळेस आम्ही सत्तेच्या जवळ जाऊन आलाे. मात्र सत्तेचा विचार केला नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडतात. त्यावर पाटील यांनी सांगितले की, अर्थातच या गाेष्टी पाहून आम्हाला दुखच हाेते. जी कामे असतात ती बाजूला राहतात. त्यांच्या तडजाेडीच्या राजकारणात ते व्यस्त असतात. त्यामुळे लाेकांची कामे हाेत नाही. लाेकांची कामे रेंगाळली जातात. एक स्थीर सरकार हे देशाच्या राज्याच्या हिताचे असते.