मानसिक त्रासातून पूजाची आत्महत्या, चॅटींगवरून वाद; पतीसमवेत अन्य एकावर गुन्हा दाखल

By प्रशांत माने | Published: September 3, 2023 04:09 PM2023-09-03T16:09:24+5:302023-09-03T16:10:11+5:30

जळगाव येथील मोदीपूर येथे राहणारी पूजा पती किरण समवेत राहायची. सहा महिन्यापूर्वीच दोघांचे लग्न झाले होते.

Pooja's suicide due to mental distress, argument over chatting; | मानसिक त्रासातून पूजाची आत्महत्या, चॅटींगवरून वाद; पतीसमवेत अन्य एकावर गुन्हा दाखल

मानसिक त्रासातून पूजाची आत्महत्या, चॅटींगवरून वाद; पतीसमवेत अन्य एकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

डोंबिवली: जळगाव येथून पतीसमवेत नणंदेकडे रक्षाबंधनासाठी आलेल्या पूजा सोळंके (वय १९) या विवाहितेने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास सागर्ली गाव येथील जय गुरूदेव अपार्टमेंट येथे घडली होती. दरम्यान तीचे वडील अशोक भगवान शिंदे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती करण सह गोपाळ शिंदे नामक व्यक्तिविरोधात मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.

जळगाव येथील मोदीपूर येथे राहणारी पूजा पती किरण समवेत राहायची. सहा महिन्यापूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. पूजा पतीसमवेत रक्षाबंधनासाठी नणंदेकडे डोंबिवलीत आली होती. शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास तीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारून आपले जीवन संपविले. या घटनेची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पूजाचा आणि पतीचा वाद झाला होता. त्यातून रागाच्या भरात तीने हे पाऊल उचलले आहे अशी प्राथमिक माहीती चौकशीत समोर आली होती.

दरम्यान तीचे वडील अशोक यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पती किरण आणि गोपाळ शिंदे हे दोघे पूजाच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे म्हंटले आहे. पूजाला किरण ने शारीरीक आणि मानसिक त्रास दिला तसेच पूजा ही गोपाळ शिंदे याच्याशी मोबाईलवर चॅटींग करीत असल्याच्या कारणावरून पती किरणने तिच्याशी वाद घातला तर दुसरीकडे गोपाळ हा पूजा ला त्याच्यासोबत बोलण्याबाबत वारंवार मेसेज करून मानसिक त्रास देत होता. या दोघांच्या त्रासामुळे पूजा ने आत्महत्येचे पाऊल उचलले असे तीचे वडील अशोक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

Web Title: Pooja's suicide due to mental distress, argument over chatting;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.