एमआयडीसीत बांधलेले नाले, गटार, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे? डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने घेतला आक्षेप 

By अनिकेत घमंडी | Published: October 10, 2022 02:01 PM2022-10-10T14:01:40+5:302022-10-10T14:02:49+5:30

एमआयडीसीला दिले पत्र 

poor quality of drains sewers road works constructed in midc dombivli welfare association objected | एमआयडीसीत बांधलेले नाले, गटार, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे? डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने घेतला आक्षेप 

एमआयडीसीत बांधलेले नाले, गटार, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे? डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने घेतला आक्षेप 

Next

डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी आणि औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी प्राधिकरणाने नवीन नाले,गटारी बांधण्याचे काम नुकतेच केले. मात्र ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, तांत्रिक दृष्ट्या चुकीचे असल्याचे रहिवाश्यांच्या निर्दशनास आले आहे. त्या कामाची चौकशी करावी आणि तातडीने आवश्यक त्या सुधारणा कराव्यात अन्यथा जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा संस्थेचे सचिव राजू नलावडे यांनी सोमवारी पत्राद्वारे दिला आहे. 

त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी अद्याप जुनीच, बुजलेली गटारे तशीच ठेवण्यात आली आहेत. याबाबतीत एमआयडीसी कार्यालयात विचारणा केली असता सदर कामांसाठी आलेला निधी संपल्याने अनेक ठिकाणी नवीन गटारी बांधण्यात आली नसल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. जी गटारे,नाले बांधण्यात आली ती तांत्रिक बाबींचा विचार न करता निकृष्ट दर्जाची बांधल्यामुळे या पावसाळ्यात नेहमी प्रमाणे पावसाळी पाणी हे रस्त्यावर आलेच शिवाय ही बांधलेली नवीन गटारींचा पावसाळी पाणी जाणारा प्रवाह हा कुठे थांबलेला, तुंबलेला तर काही ठिकाणी गटारातील पाणी वाहण्याचा प्रवाह हा गटारीची रुंदी,खोली कमी जास्त असल्याने त्यातून अतिशय संथ गतीने पाण्याचा निचरा झाला. 

काही ठिकाणी गटारींचे काम अर्धवट स्थितीत ठेवल्याचे दिसत आहे. आपल्याकडून या ठेकेदार द्वारा बांधण्यात येत असलेल्या नवीन गटारी बांधकामावर देखरेख, नियंत्रण नसल्याने या गटारी,नाले यासाठी आलेला निधीचा योग्य वापर न झाल्याचा व त्यात भ्रष्टाचार झालेला दिसत असून हा जनतेचा पैशाचा दुरुपयोग झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. 

निवासी आणि औद्योगिक भागातील ड्रेनेज सिस्टीम, सांडपाणी वाहिन्या/चेंबर्स या अंदाजे ४५ वर्षे जुन्या झाल्याने त्या अनेक ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत. त्या जागोजागी फुटल्याचे आणि चेंबर्स तुंबल्याने त्यातून घरगुती व रासायनिक सांडपाणी वाहत असल्याचे दिसते. यामुळे दुर्गंधी येऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन येथील नागरिकांचा आरोग्यावर परिणाम होत आहे. याबद्दल वारंवार तक्रारी कराव्या लागत आहेत. 

एमआयडीसीकडून याबाबतीत नवीन ड्रेनेज वाहिन्या बांधण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे गेल्या दोन वर्षापासून सांगण्यात येत आहे, पण असे असतानाही नागरिकांकडून ड्रेनेज कर दर महिन्याला पाण्याचा बिलाबरोबर सुरुवाती पासून का घेतला जात असल्याचे नलावडे म्हणाले. शिवाय केडीएमसी पण हाच कर घेतला जातो तो वेगळाच असल्याचे ते म्हणाले. एमआयडीसी मध्ये नवीन काँक्रिटचे रस्ते होणार म्हणून मागील दोन वर्षांपासून केवळ आश्वासन मिळत असल्याचे ते म्हणाले. औद्योगिक भागातील रस्ते काम एमआयडीसी कडून अतिशय संथ गतीने करण्यात येत आहे तर निवासी विभागातील रस्ते काम हे अद्याप चालू करण्यात आले नाही आहे. 

एमआयडीसी मधील रस्त्यांची दुर्दशा अतिशय खराब झाली आहे हे आपणास माहितीच आहे. सदर रस्त्यांचे काम चालू होण्यापूर्वी तातडीने गटारी,नाले,ड्रेनेज सांडपाणी वाहिन्या यांचे काम करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर बनविण्यात येणाऱ्या नवीन रस्त्यांची पण लवकरच दुर्दशा झालेली पाहण्यास मिळेल. या सर्व बाबींकडे गांभीर्याने बघावे आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असेही ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: poor quality of drains sewers road works constructed in midc dombivli welfare association objected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.