महिलांनी बुजवले ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे; भाजप महिला आघाडीचे खड्डेभरो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 04:50 PM2021-08-03T16:50:20+5:302021-08-03T16:50:50+5:30

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा अपघात होईल का? अशी भीती व्यक्त केली आहे.

potholes on Thakurli flyover filled by BJP womens front agitation | महिलांनी बुजवले ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे; भाजप महिला आघाडीचे खड्डेभरो आंदोलन

महिलांनी बुजवले ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे; भाजप महिला आघाडीचे खड्डेभरो आंदोलन

Next

 डोंबिवली: कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा अपघात होईल का? अशी भीती व्यक्त केली आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम शहराला जोडणार्या सध्याच्या एकमेव ठाकुर्ली उड्डाण पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या उड्डाणपुलावर मंगळवारी खड्डेभरो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करून लक्ष वेधले.

त्या आंदोलनात माजी नगरसेविका खुशबू चौधरी, अमृता जोशी, मनीषा छल्लारे, वर्षा परमार, हेमलता संत, चित्रा माने, सायली सावंत, धरती गडा, वंदना आठवले आदी महिल सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात भाजपा महिलांनी रस्तावर पडलेल्या खड्ड्यात माती-विटांची भरणी करून ते खड्डे बुजविले.महिलांनी स्वतः भरलेली मातीची घमेली-फावडे घेऊन खड्डे भरले. सामान्य नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये ही भूमिका या आंदोलनामागे होती.यावेळी पुनम पाटील म्हणाल्या, शहरभर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.पालिका प्रशासन झोपी गेले असून त्यांना रस्त्यांकडे बघायला वेळ नाही.

रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला होता त्याचे पुढे काय झाले. रस्त्यांची दुरवस्था का होते याची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली पाहिजे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत.रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी होत आहे. आयुक्तांनी याची दखल घेऊन खड्डेमुक्त रस्ते करावे. फक्त सणवार आले की रस्त्यांची डागडुजी करून रस्त्याला मलमपट्टी लावू नये टीका केली.तर ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या वंदना आठवले म्हणल्या, या खड्ड्यांमध्ये पडून वाहनचालक जखमी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असे यावेळी सांगितले.विशेष म्हणजे कधी नव्हे ते वाहतूक पोलीस आंदोलनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये आले होते.तर सामान्य नागरिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला आमचा पांठिबा असून या पुलावरील खड्डे कधी बुजतील असा प्रश्न उपस्थित केला.
 

Web Title: potholes on Thakurli flyover filled by BJP womens front agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.