अत्यावश्यक कामांसाठी डोंबिवलीत मंगळवारी वीज पुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 03:29 PM2021-05-10T15:29:29+5:302021-05-10T15:32:24+5:30

Kalyan-Dombivali News : वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर यासंदर्भात संदेश पाठवण्यात आले असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

Power supply to Dombivali will be cut off on Tuesday for essential works | अत्यावश्यक कामांसाठी डोंबिवलीत मंगळवारी वीज पुरवठा राहणार बंद

अत्यावश्यक कामांसाठी डोंबिवलीत मंगळवारी वीज पुरवठा राहणार बंद

Next

डोंबिवली - अत्यंत महत्वाच्या व तातडीच्या देखभाल-दुरुस्ती तसेच पावसाळा पूर्व कामांसाठी डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर यासंदर्भात संदेश पाठवण्यात आले असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

जोशी हायस्कूल जवळचे तीन रोहित्र व या रोहित्रांवरील उच्च व लघुदाब वाहिन्या स्थलांतरित करावयाच्या आहेत. याशिवाय पावसाळ्यातील संभाव्य बिघाड टाळण्यासाठी वृक्षाच्या फांद्या छाटणे, वेली दूर करणे, रिजपरिंग, नटबोल्ट बदलणे, जीओडी मेंटेनन्स आदी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद राहणार आहे. 

या भागात होणार वीज खंडीत

विशेषतः बाजीप्रभू उपकेंद्रांतर्गत कोपर रोड, शास्त्रीनगर, जुनी डोंबिवली भागात सकाळी ११ ते दुपारी २ तर ठाकुर्लीतील पीव्ही रोड, छेडा रोड, पेंडसेनगर, ९० फीट रोड, चोळेगाव, हनुमान मंदीर परिसर, ठाकुर्ली स्टेशन, विवेकानंद सोसायटी, पंचायत बावडी, बालाजीनगर, नेहरू रोड, फडके रोड, फते अली रोड, गणेश मंदीर व परिसर, सावरकर रोड भागात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहील. 

गरिबाचा पाडा फिडरवरील महाराष्ट्रनगर, सरोवरनगर, सह्याद्रीनगर, मल्हारनगर, श्रीधर म्हात्रे चौक भागाचा सकाळी ९ ते दुपारी १२ तर काळूनगर फिडरवरील ठाकूरवाडी, काळूनगर, आनंदनगर व सम्राटनगरच्या काही भागाचा वीजपुरवठा दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच दरम्यान बंद राहणार असल्याचे महावितरणने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर करण्यात आले आहे.
 

Web Title: Power supply to Dombivali will be cut off on Tuesday for essential works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.