डोंबिवली अन् कल्याण पूर्वेच्या काही भागात दोन दिवस वीजपुरवठा राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:36 PM2022-04-20T16:36:37+5:302022-04-20T16:36:42+5:30
डोंबिवली : वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवली व कल्याण पूर्व भागातील काही भागांचा वीजपुरवठा बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ...
डोंबिवली : वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवली व कल्याण पूर्व भागातील काही भागांचा वीजपुरवठा बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येणार असल्याचे महावितरणने मंगळवारी स्पष्ट केले.
डोंबिवलीतील रामनगर फिडरवरील रामनगर पोलीस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांतीनगर, मद्रासी मंदिर, म्हात्रेनगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात बुधवारी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद असेल. दत्तनगर फिडरवरील स्वामी शाळा, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जुना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगीतावाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड, तुकारामनगर फिडरवरील आयरे रोड, तुकारामनगर, सुदामवाडी, आयरेनगर, पाटकर शाळा या भागात गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
कल्याण पूर्व मधील आजदे फिडरवरील आजदे, पाथर्ली, सागर्ली, एमआयडीसी कॉलनी, आजदेपाडा, जिमखाना रोड, शेलार नाका, इंदिरा नगर झोपडपट्टी, रेल्वे कॉलनी, त्रिमुर्तीनगर झोपडपट्टी भागात आणि २२ केव्ही टेम्पो नाका फिडर व २२ केव्ही एमआयडीसी फिडर क्रमांक ११ वरील एमआयडीसी फेज दोनमधील अंशत: काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास या भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या स्वंयचलित प्रणालीमार्फत संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर ‘एसएमएस’द्वारे वीज बंदबाबत पूर्वकल्पना देण्यात आल्याचा दावा महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.