साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एसओपी तयार करुन अंमलबजावणी करा
By मुरलीधर भवार | Updated: June 20, 2024 21:47 IST2024-06-20T21:47:31+5:302024-06-20T21:47:39+5:30
केडीएमसी आयुक्तांचे आदेश

साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एसओपी तयार करुन अंमलबजावणी करा
कल्याण-कल्याण-डोंविबलीत जोरदार पावसामुळे सखल भागातील पाणी साचण्याचे प्रकार घडले. चोकअपपॉईंटवरुन पाण्याचा निचरा होण्यासाठी त्वरीत एसओपी तयार करावी. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश महापालिका आयुक्त डा’. इंदूराणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ््यांना दिले आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्याकरीता वाढीव मनुष्यबळ पुरविले जाईल. महापालिकेतील दहा प्रभाग क्षेत्राकरीता पाच जेसीबी आणि पाच डंपर पुरविण्यातआले आहेत.
धोकादायक झाडे पडून काही हानी होवू नये म्हणून वृक्ष आणि प्राधिकरण विभागाने समन्वय अधिका-याची नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधण्यासाठी महापालिकेची वॉकी-टॉकी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.आपत्कालीन परिस्थितीत नागरीकांच्या सोयीसुविधांसाठी १८००२३३७३८३ आणि १८००२३३४३९२ हे दोन टोल-फ्री संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरीकांच्या अडचणी प्रभाग कार्यालय स्तरावर सोडविण्यात याव्यात असे आदेश आयुक्तांनी दिले आहे. आपतकालीन परिस्थितीत सर्व अधिकारी वर्गाने सर्तक राहावे असेही सूचित केले आहे.