लोक संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज, डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन

By मुरलीधर भवार | Published: January 8, 2024 02:21 PM2024-01-08T14:21:25+5:302024-01-08T14:22:55+5:30

कल्याण मुरबाड रोडवरील गोवेली येथे ग्रामदेवता आणि स्थानीय देवता सांस्कृतिक परंपरा या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. 

Preservation of folk culture is the need Dr Commentary by Arun Dhere | लोक संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज, डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन

लोक संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज, डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन

कल्याण-लोक संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. रा.चि. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी येथे केले. कल्याण मुरबाड रोडवरील गोवेली येथील जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणिअश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदेवता आणि स्थानीय देवता सांस्कृतिक परंपरा या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. 

या प्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ. प्राची मोघे, डॉ .विजय कुलकर्णी आणि जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे इतिहास संशोधक अविनाश हरड यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के बी कोरे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत घोडविंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.विजय कुलकर्णी यांनी केले. त्यानी ग्रामदेवतेची सविस्तर माहिती सांगितली. त्यात त्यांनी ग्रामदेवतांची नावे कशी पडली. हे स्पष्ट केले. घोडविंदे यांनी इतिहास परिषद घेण्यामागचा हेतू स्पष्ट करताना जागृत देवता अजून भूतलावर आहे परंतु त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन अंधश्रद्धा पसरवून अनेक वेळेस लोकांना फसवले जाते असे होऊ नये. यासाठी आपल्याला आपल्या देवी देवतांचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे.

डॉ. ढेरे यांनी देवी देवतां विषयी संशोधन नातील अनुभव सांगितले. देवी देवतांशी संबंधित कथा सांगितली. लोक साहित्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे लोक परंपरांचा जन्म आदीम काळापासून सुरू आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी केले. त्यानंतर २५ शोध निबंध दोन सत्रात सादर सादर केले. प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉ. शामराव वाघमारे हे होते तर द्वितीय सत्राचे अध्यक्ष डॉ. कुलकर्णी हे होते. या वेळी पुरातन वस्तूंचे व पुस्तकांचे कला दालन उभारण्यात आले होते. याला सहभागी संशोधकांनी आणि मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ मोघे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित संशोधकानीं आपले परिषदे विषयी अनुभव मांडले.

या एक दिवसीय राष्ट्रीय इतिहास परिषदेच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात रिल्स मेकिंग या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणाली पष्टे आणि अंकिता हरड, द्वितीय क्रमांक मानसी धनगर आणि धनाजी चहाड ,तृतीय क्रमांक पूर्वा कराळे आणि इनाया पटेल ,पोस्टर मेकिंग या स्पर्धेत प्रथम पूर्वी शिरसागर ,द्वितीय क्रमांक कल्पेश शिंगवा, तृतीय क्रमांक मयुरी गायकर तसेच फोटोग्राफी या स्पर्धेत प्रथम क्रमांक यश गायकवाड द्वितीय क्रमांक सेजल पाटील, तृतीय क्रमांक विशाखा तरे यांनी पटकाविला. 

Web Title: Preservation of folk culture is the need Dr Commentary by Arun Dhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण