आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By मुरलीधर भवार | Published: March 3, 2024 07:45 PM2024-03-03T19:45:42+5:302024-03-03T19:46:16+5:30

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

previous government shed crocodile tears Chief Minister eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

कल्याण- आधीचे महाविकास आघाडीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे सरकार होते. मात्र आमचे सरकार हे सर्व सामन्यांचे अश्रू पुसणारे सरकार आहे अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कल्याण शीळ राेड लगत असलेल्या कोळेगावातील प्रिमियम ग्राऊंडवर आज शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपरोक्त टिका केली.

या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री शंभराजे देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार किसन कथोरे, संजय केळकर, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना आमदार रविंद्र फाटक आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की फेसबूक लाईव्ह करुन सरकार चालविता येते नाही. ग्राऊंडवर जाऊन काम करावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतात साचलेला चिखल तुडवित पाहणी करावी लागते. घरात बसून ते काम होत नाही. आमचे सरकार लोकाभिमुख आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून सरकारमधील प्रत्येक अधिकारी कर्मचारी हा लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचला आहे. या आधीच्या सरकारमध्ये निर्णय घेण्याचे धाडस नव्हेत. एखाद्या प्रश्नावर आंदोलने होतात. 

तेव्हा त्यांना विश्वास द्यावा लागतो. दिलेला शब्द पाळावा लागतो. दिलेला शब्द पाळण्याचे आणि निर्णय घेण्याचे धाडस आमच्या सरकारने दाखविले आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्याला फायदा केंद्रात कोणताही पाठविलेला विकासाचा प्रस्ताव लगेच मंजूर होतो. त्याचा फायदा जनतेला व्हावा हाच आमच्या सरकारचा उद्देश आहे. कोणत्याही राजकीय नेत्याच्या वैयक्तीक फायद्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला नाही. सामान्य जनतेच्या फायद्यासाठी निर्णय घेतले आहेत. मागील सरकारच्या अहंकारी वृत्तीमुळे रखडलेले प्रकल्प आमच्या सरकारने मार्गी लावले आहेत. 

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मोदी यांच्या सत्ता काळात देशातील गरीबी हटविण्याचे काम खऱ्या अर्थाने झाले असल्याची बाबही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केली. १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट केली आहे. तसेच कल्याण शीळ रस्ते बाधितांच्या मोबदल्याचा निर्णय लवकर घेऊन त्यांना मा्ेबदला दिला जाणार आहे. तसेच बदलापूर कांजूरमार्ग मेट्रोचे काम हाती घेतले जाणार आहे या गोष्टीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आश्वासित केल्या. खासदार शिंदे म्हणाले आपल्या सरकारच्या काळात एमएमआर रिजनला जास्तीत जास्त विकास निधी मिळाला असल्याने हजोरो कोटीची विकास कामे सुरु आहेत.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते डोंबिवलीतील सुतिका गृह आणि कर्कराेग रुग्णालय, डोंबिवली पश्चिमेतील फिश मार्केट आणि कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले तेव्हा उपस्थितांना मोबाईल टॉर्च पेटवून त्यांचे जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनाचा लाभ वाटप करण्यात आला.

Web Title: previous government shed crocodile tears Chief Minister eknath Shinde criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.