मुंबई, ठाणे, पालघरच्या मुख्याध्यापकांना मिळणार स्टार्सचे प्रमाणपत्र

By अनिकेत घमंडी | Published: October 14, 2023 12:09 PM2023-10-14T12:09:36+5:302023-10-14T12:10:15+5:30

ठाण्यातील २२० मुख्याध्यापकांना दिलासा अनिल बोरनारे यांची माहिती

Principals of Mumbai, Thane, Palghar will get STARS certificate | मुंबई, ठाणे, पालघरच्या मुख्याध्यापकांना मिळणार स्टार्सचे प्रमाणपत्र

मुंबई, ठाणे, पालघरच्या मुख्याध्यापकांना मिळणार स्टार्सचे प्रमाणपत्र

डोंबिवली: अध्ययन- अध्यापन प्रक्रिया बळकट करण्याच्या संदर्भात ठाणे,रायगड, पालघर व मुंबईसह राज्यातील मुख्याध्यापकांचे ऑनलाईन प्रशिक्षण होऊनही शासनाकडून मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र मिळत नव्हती. अखेर भाजप प्रदेशचे निमंत्रित, मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी यंत्रणेकडे पाठपुरावा केल्याने लवकरच सर्व मुख्याध्यापकांना स्टार्स चे प्रमाणपत्र मिळणार आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील २२० शाळांमधील मुख्याध्यापकांचा समावेश आहे.

राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम याचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसहाय्यित केंद्रशासन पुरस्कृत स्टार्स या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या (स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, शासकीय अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा, समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या शाळा) शाळांमध्ये मुख्याध्यापक व प्राचार्यांचे इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या संगणक प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था यांनी आयोजित केले होते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुख्याध्यापकांना संस्थेने प्रमाणपत्र देणे आवश्यक होते, याबाबत मुंबई ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापकांनी अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

बोरनारे यांनी संबंधित संस्थेकडे ३ ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन तातडीने मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती, अखेर महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या संचालकांनी बोरनारे यांना मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करीत असल्याचे ९ ऑक्टोबर रोजी बोरनारे यांना लेखी पत्र दिले त्यामुळे लवकरच मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

Web Title: Principals of Mumbai, Thane, Palghar will get STARS certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.