केबल दुरुस्तीच्या वादातून एनआरसी कंपनीच्या खाजगी बाऊन्सरने केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 03:57 PM2021-01-23T15:57:19+5:302021-01-23T15:59:23+5:30
Kalyan-Dombivali Crime : तुटलेल्या केबल दुरुस्तीच्या बिलापोटी पैसे द्या अशी मागणी कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून केली जात होती. कंपनीचे अधिकारी व एमएमआरडीएचे अधिकारी यांच्या वाद सुरु असताना कंपनीचे खाजगी बाऊन्सरने हवेत गोळीबार केला.
कल्याण - एमआआरडीएकडून मोहने परिसरात रस्ता कॉक्रीटीकरणाचे काम आहे. यावेळी एनआरसी कंपनीला पाणी पंपाला वीज पुरवठा करणारी केबल तुटली. तुटलेल्या केबल दुरुस्तीच्या बिलापोटी पैसे द्या अशी मागणी कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून केली जात होती. कंपनीचे अधिकारी व एमएमआरडीएचे अधिकारी यांच्या वाद सुरु असताना कंपनीचे खाजगी बाऊन्सरने हवेत गोळीबार केला. या घटनेत कोणी जखमी झालेले नाही. मात्र गोळीबार करणा-या बाऊन्सरला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बाऊन्सरचे नाव अनिलकुमार सिंग असे आहे.
ही घटना सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु असताना एनआरसी कंपनीच्या पंपाला पुरवठा करणारी वीजेची केबल तुटली. ही केबल तुटल्याने एनआरसी कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत झाला होता. केबल दुरुस्तीचा खर्च भरुन द्या अशी मागणी कंपनीचे अधिकारी होती. एमआरडीएचे अधिकारी कंपनीकडून जास्तीचा खर्च सांगितला जात असल्याचे सांगत होते. त्यामुळे हा वाद मिटत नव्हता. हा सुरु असताना कंपनीचे खाजगी बाऊन्सर त्याठिकाणी पोहचले. त्यापेैकी अनिलकुमार सिंग या बाऊन्सरने हवेत गोळीबार केला. गोळी कोणाला लागली नाही. मात्र गोळीबार होताच सगळेच भितीपोटी पांगले. पोलिसांनी अनिलकुमार सिंगला अटक केली आहे.
एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिली गेली नसताना कंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरे व बंगले यांचे पाडकाम सुरु आहे. त्याला कामगारांचा विरोध सुरु आहे. या प्रकरणी २५ कामगारांना पोलिसांनी चार दिवसापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा आज केबल दुरुस्तीवर अधिका:यांमध्ये वाद सुरु असताना कंपनीच्या खाजगी बाऊन्सरकडून गोळीबार केला गेल्याने एक प्रकारे दशहत माजविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे कामगार वर्गाकडून सांगण्यात आले.