खासगी रुग्णालयाला १० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:44 PM2021-05-03T23:44:25+5:302021-05-03T23:44:33+5:30

केडीएमसीची कारवाई : जैविक कचरा टाकला उघड्यावर

Private hospital fined Rs 10,000 | खासगी रुग्णालयाला १० हजारांचा दंड

खासगी रुग्णालयाला १० हजारांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मनाई असतानाही जैविक वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्या पश्चिमेतील श्री सद्गुरू कृपा या खासगी रुग्णालयावर केडीएमसीने दंडात्मक कारवाई केली आहे. पश्चिमेतील घन:श्याम गुप्ते रोडवरील बदाम गल्लीत मोकळ्या जागेत जैविक कचरा (मेडिकल वेस्ट) टाकण्यात आला होता. याप्रकरणी या रुग्णालयाकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जैविक वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास त्यापासून नागरिकांना अपाय होऊ शकतो, याकरिता हा कचरा रुग्णालय आणि क्लिनिक यांच्याकडून संकलित करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने उंबर्डे येथील बायोमेडिकल प्रकल्पावर विघटन करण्यासाठी आरोग्य विभागाने एजन्सीची नियुक्ती केलेली आहे. या एजन्सीकडे आपल्या दवाखान्यातील, क्लिनिकमधील जैविक कचरा देणे अपेक्षित असतानाही पश्चिमेतील श्री सद्गुरू कृपा या रुग्णालयामधून मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात जैविक कचरा टाकला जात असल्याची तक्रार ट्विटरद्वारे प्राप्त होताच मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या सुचनेनुसार ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, प्रभारी आरोग्य निरीक्षक नवनाथ लांडगे यांनी संबंधित ठिकाणी समक्ष पाहणी केली. यात रुग्णालयाने सार्वजनिक ठिकाणी जैविक कचरा टाकत असल्याचे प्रत्यक्ष दिसून येताच रुग्णालयास दंड भरण्यास सांगितले. परंतु, प्रारंभी रुग्णालयाने दंड भरण्यास नकार दिला. यावर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगताच संबंधित रुग्णालयाने १० हजार रुपयांचा दंड महापालिकेकडे जमा केल्याची माहिती प्रभाग अधिकारी गुप्ते यांनी दिली.

Web Title: Private hospital fined Rs 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.