डोंबिवलीत पुन्हा प्रोबेसची पुनरावृत्ती, भयभीत रहिवासी
By अनिकेत घमंडी | Published: May 23, 2024 03:28 PM2024-05-23T15:28:45+5:302024-05-23T15:29:10+5:30
आज तिच पुनरावृत्ती डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल्स मध्ये स्फोट होवून झाली आहे. त्यावेळी प्रोबेस स्फोटाची चौकशी समिती नेमली होती.
डोंबिवली: 16 मे 2016 रोजी डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन 12 जणांचा मृत्यू झाला होता तर दोनशे वर नागरिक जखमी झाले होते. नागरिकांच्या करोडो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले होते.
आज तिच पुनरावृत्ती डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल्स मध्ये स्फोट होवून झाली आहे. त्यावेळी प्रोबेस स्फोटाची चौकशी समिती नेमली होती. तो अहवाल जनतेसमोर आणण्यात आलाच नाही आणि त्यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आता पुन्हा तेच तेच चौकशा समित्या नेमणार हे नक्की. प्रोबेस स्फोटातील नुकसान झालेल्या मालमत्ता धारकांना आणि काही जखमी होऊन जायबंदी झाले होते त्यांनाही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही आहे.
आज झालेल्या स्फोटाने अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे समजले आहे. इमारतींना स्फोटाचा वेळी मोठे हादरे बसले. एमआयडीसी फेज मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी, सोनार पाडा इत्यादी भागात नुकसान झाले आहे. सदर भागात काही लोखंडी भागांचे अवशेष पडल्याचे दिसत आहे. स्फोट झालेल्या परिसरातील नागरिक भयभयीत झाले असून असे काही महिन्याच्या अंतराने दुर्घटना होत असल्याने नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी मधील अती धोकादायक कंपन्या त्वरित येथून हलविण्यात याव्यात ही येथील जनतेची मागणी आता तरी पूर्ण करा. आता या स्फोटामुळे किती जखमी, मृत्यू झाले याची माहिती अद्याप मिळाली नाही पण नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसत आहे. डोंबिवली बचाव, अती धोकादायक कंपन्या हटाव : राजु नलावडे