ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास नागरीकांच्याच पैशाची बचत होणार- श्रीकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 01:52 PM2021-07-11T13:52:45+5:302021-07-11T13:53:00+5:30
महावीर सोसायटीत कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्पाचा शुभारंभ
कल्याण- शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला सुका कचरा वर्गीकरण करुन ओल्या कच:यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरीकांच्याच पैशाची बचत होणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
डोंबिवलीतील पूर्व भागातील महावीरनगर सोसायटीने पुढाकार घेऊन ओल्या कच:यापासून खत निर्मितीचा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ काल शनिवारी खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी राजेश कदम, भाजप माजी नगरसेविका सुनीता पाटील, समाजसेवक संजय चौधरी आदी उपस्थित होते.
खासदार शिंदे यांनी सांगितले की, ओला सुका कचऱ्यांचे वर्गीकरण ही काळाची गरज आहे. महापालिकेने शून्य कचरा मोहिम गेल्या दीड वर्षापासून सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत आत्तार्पयत साडे तीन हजार मेट्रीकटन ओल्या कच:यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती केली आहे. महापालिका हद्दीतील जवळपास 50 बड्या सोसायटय़ांनी ओल्या कच:यापासून खत निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
अनेक सोसायटय़ांनी सोसायटीच्या आवारातच ओल्या कच:यापासून खत निर्मिती केल्यास महापालिकेवरील ओल्या कच:यावर प्रक्रीया करण्याचा भार कमी होईल. महापालिका ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करते. त्यावर खर्च होणारा पैसे हे नागरीकांच्या करातून गोळा झालेले असतात. प्रक्रियेवरील महापालिकेची पैसे वाचणार म्हणजेच जनतेच्या पैशाची बचत होईल याकडे खासदारांनी लक्ष वेधले आहे. सर्व लहान मोठय़ा सोसायटय़ांनी ओला सुका कचरा वर्गीकरणास सहकार्य करुन शहर कचरा मुक्त करण्याच्या मोहिमेस पूर्णपणो हातभार लावावा असेही आवाहन खासदार शिंदे यांनी करीत महावीर सोसयटीच्या उपक्रमाचे कौतूक केले.