कल्याणमध्ये एमसीएचआयचे प्रॉपर्टी प्रदर्शन

By मुरलीधर भवार | Published: January 29, 2024 05:39 PM2024-01-29T17:39:17+5:302024-01-29T17:39:46+5:30

पंसतीतील आणि आर्थिक आवाक्यातील घर प्रत्येकाला खरेदी करण्यात यावे याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

property exhibition of mchi in kalyan | कल्याणमध्ये एमसीएचआयचे प्रॉपर्टी प्रदर्शन

कल्याणमध्ये एमसीएचआयचे प्रॉपर्टी प्रदर्शन

मुरलीधर भवार, कल्याण-कल्याण डोंबिवली क्रेडाई एमसीएचआयच्या वतीने येत्या ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान १३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शानाचे आयोजन फडके मैदानात आयोजित करण्यात आले आहे. पंसतीतील आणि आर्थिक आवाक्यातील घर प्रत्येकाला खरेदी करण्यात यावे याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

या संदर्भात माहिती देण्यासाठी एमसीएचआयच्या वतीने आज दुपारी गोदरेज हिल येथील संस्थेच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा, माजी अध्यक्ष रवी पाटील, प्रदर्शन समितीचे सरचिटणीस सुनिल चव्हाण यांच्यासह अरविंद वरक, राजेश गुप्ता, दिनेश मेहता, विकास वीरकर, साकेत तिवारी, जयेश तिवारी, राेहित दिक्षित, राहूल कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहपारू, ठाणे, शीळफाटा या परिसरातील सर्व सुविधांयुक्त घरे बघण्याची संधी कल्याण डाेंबिवलीकरांना मिळणार आहे.

१८ लाखापासून ते १ कोटी रुपये किंमतीची घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनाात ४० हून अधिक बिल्डरांचे १५० गृह प्रकल्प एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनाला २५ हजार पेक्षा जास्त नागरीक भेट देतील असा अंदाज आहे. यावर्षी स्पा’ट बुकिंग डिसकाऊंट दिले जाणार आहे. प्रत्येक तासाला एक लकी ड्रा’ काढला जाणार आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री शमिता शेट्टी या प्रदर्शनाला भेट देणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत मंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड आदी मान्यवर प्रदर्शनाला भेट देणार आहेत.

Web Title: property exhibition of mchi in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण