कचरा पेटवून केला निषेध! माजी नगरसेवकासह नागरीक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 07:09 PM2021-08-02T19:09:08+5:302021-08-02T19:09:37+5:30

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणचा कचरा महापालिकेकडून उचलला जात नाही.

Protest by burning garbage Citizens angry with former corporator | कचरा पेटवून केला निषेध! माजी नगरसेवकासह नागरीक संतप्त

कचरा पेटवून केला निषेध! माजी नगरसेवकासह नागरीक संतप्त

googlenewsNext

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणचा कचरा महापालिकेकडून उचलला जात नाही. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नांदिवली परिसरातील संतप्त नागरीकांनी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने साचलेला कचरा पेटवून देत प्रशासनाचा निषेध केला. प्रशासनाने दखल घेतली नाही तर यापूढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

27 गावातील कचरा उचलला जात नाही. कच:या उचलला जात नसल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत माजी अपक्ष नगरसेवक पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार लक्ष वेधले ाहे. प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही.  महापालिकेच्या अनास्थेला कंटाळून संतप्त नागरीकांच्या उपस्थित माजी नगरसेवक पाटील यांनी आज दुपारी नांदिवली येथील रस्त्यावर न उचललेल्या कच:याला आग लावून पेटून दिला. कचरा पेटवून महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.

महापालिकेने मे 2020 पासून शून्य कचरा मोहिम सुरु केली आहे. महापालिका हद्दीत कोरोना काळ सुरु असताना शून्य कचरा मोहिम राबविण्यास काही नगरसेवकांचा विरोध होता. तर काही नगरसेवकांनी त्याचे समर्थन केले होते. महापालिकेने शून्य कचरा मोहिम राबवित असताना कचरा कुंडय़ा काढून टाकल्या होत्या. नागरीकांनी कचरा वर्गीकरण द्यावा असे आवाहन केले होते. ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन द्यावा अशी सक्ती महापालिकेने केली आहे. मात्र जे नागरीक ओला सुका कचरा वर्गीकरण करुन देत नाही. त्यांचा कचरा महापालिका स्विकारत नाही. त्यामुळे त्यांचा कचरा रस्त्यावर टाकला जातो.  टाकण्यात आलेला कचरा महापालिकेचे सफाई कर्मचारी उचलून कचरा गाडीत टाकत नाही. महापालिकेच्या शहरी भागात शून्य कचरा मोहिम चांगल्या प्रकारे राबविली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात 27 गावे महापालिकेत होती. त्यापैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 9 गावे महापालिकेत आहेत. गावे वगळण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. 27 गावातील कचरा योग्य प्रकारे नियमीत उचलला जात नाही. 27 गावीत प्रत्येक ठिकाणी कचरा उचलला जात नाही, असा नागरीकांचा आरोप आहे.

Web Title: Protest by burning garbage Citizens angry with former corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण