राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या पुतळ्याचे दहन करून निषेध!
By अनिकेत घमंडी | Published: November 21, 2022 04:27 PM2022-11-21T16:27:52+5:302022-11-21T16:28:16+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
डोंबिवली: कल्याण शिळफाटा येथील गोळवली नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील उपस्थित होते.
ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. हे राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत. या काळात टोपीच्या मागे काय दडलंय? ही काळी टोपी जाळून आम्ही याचा निषेध करीत आहोत. आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. जर का या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना महाराष्ट्रातून हटवले नाही, तर आम्ही राजभवनावर जाऊन मोठ्या स्वरूपाचे जन आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी दिला.
याप्रसंगी वल्ली राजन युवकचे पदाधिकारी मयुर गायकवाड, वैभव माळी, प्रसाद गायकवाड, वैभव मोरे, नरेश वायले, अक्षय संते, दिवेश महाजन, विकास पारधी, लखन उपाध्ये, अभिजीत बाबर, सुवर्णा केने, चंद्रकांत भिसे, यशवंत इंगोले, संजय उपाध्ये, निलेश आवळे, राजेंद्र बिडलान, अरुण शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.