ती जरी हरली तरी ती लढली याचा अभिमान, वैष्णवी पाटीलच्या प्रशिक्षकांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:55 PM2023-03-24T20:55:14+5:302023-03-24T20:57:06+5:30
पुरुष पैलवानाच्या बरोबरीनेच महिलासाठी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करत मराठी मातीतल्या कुस्ती या खेळात मुलींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रथमच होतोय .
कल्याण-
पुरुष पैलवानाच्या बरोबरीनेच महिलासाठी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करत मराठी मातीतल्या कुस्ती या खेळात मुलींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रथमच होतोय . महिला कुस्तीगीरासाठी सांगली येथे आयोजित पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटील हीने सांगलीतील प्रतीक्षा बागडी यांच्यात अंतिम सामना रंगला होता. आपल्या तालुक्यातील पैलवान केसरीच्या फायनल मध्ये गेल्याचे समजताच कल्याण नंदिवली जय बजरंग तालमीतील तिचे सहकारी तिच्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. तिच्या लढतीकडे सर्वजण सकाळपासून डोळे लावून बसले होते.सामना सुरू झाला. दोघींना चार चार पॉइंट मिळाले होते मात्र प्रतीक्षाने डाव खेळला आणि वैष्णवीचा पराभव झाला. या सामन्यात वैष्णवी पराभूत झाली असली तरी पूर्ण क्षमतेने खेळली. पहिल्याच केसरी स्पर्धेत अंतिम सामन्या पर्यंत धडक दिली त्यामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे वैष्णवी हरली असली तरी तिने चांगली लढत दिली. याआधी देखील तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. या पुढे ती पुन्हा जिंकेल असा वैष्णवीचे प्रशिक्षक सुभाष ढोणे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी वैष्णवीच्या प्रशिक्षकांनी तिच्या सहकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला
वैष्णवी अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळ या गावची.. लहानपणापासूनच तिलाच नव्हे तर आई वडिलांना देखील कुस्तीची विशेष आवड होती. वैष्णवीचया कुटुंबीयांनी तिला कुस्तीसाठी प्रोत्साहन दिले. वैष्णवी पाटील हिने कल्याण मधील नांदीवली गावातील जय बजरंग तालमीत पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे ,सुभाष ढोणे, प्रज्वलदीप ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीच धडे गिरवले. आतापर्यंत तिने सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. आपल्या तालुक्यातील पैलवान केसरीच्या अंतिम सामन्यात गेल्याचे समजताच तालमीतील तिचे सहकारी तिच्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. तिच्या लढतीकडे सर्वजण सकाळपासून डोळे लावून बसले होते. मात्र ती उपविजेती ठरली आहे. उपविजेती ठरली असली तिने हिंमत हारलेली नाही.