अक्षरआनंद दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 04:58 PM2021-11-03T16:58:39+5:302021-11-03T16:59:54+5:30
अक्षरमंच प्रकाशनाच्या अक्षरआनंद दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ इतिहासकार आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे शुभहस्ते फ्रेंड्स ग्रंथालयाचे दालनात पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली
अक्षरमंच प्रकाशनाच्या अक्षरआनंद दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ इतिहासकार आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे शुभहस्ते फ्रेंड्स ग्रंथालयाचे दालनात पार पडले. अक्षरआनंद चे कार्यकारी संपादक डॉ योगेश जोशी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अक्षर आनंद चे संपादक हेमंत नेहेते यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमात डॉ. शेवडे यांनी अंकाचे कौतुक केले आणि फ्रेंड्स ग्रंथालयाचे पुंडलिक पै यांनी या अंकास शुभेच्छा दिल्या. यंदाच्या दिवाळी अंकामध्ये देशविदेशातील लेखक व कवी यांचे साहित्य असून , साहित्यिक आणि प्रख्यात ज्योतिषी ॲड. डॉ. सोपान बुडबाडकर यांच्या षष्ठाब्दीपूर्ती निमित्याने त्यांच्या गौरवार्थ विशेष लेख, कविता व अनुभव आदी साहित्य अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अंकामध्ये डॉ. गिरीश महाजन, प्रा. डॉ. राम नेमाडे स्वानंद गोगटे, राजश्री मेणकुदळे, अर्चना वेखंडे, वि. ग. सातपुते, प्रशांत सहाणे (मलेशिया) आदी मान्यवरांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे. व्यक्तीपरिचय सदरांतर्गत देवेंद्र भुजबळ (रश्मी हेडे) , राजेंद्र गोसावी( ॲड रुपेश पवार) ,शमशाद बेगम मुल्ला ( निलिमा पाटील) आदी मान्यवरांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देण्यात आला आहे