हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती

By अनिकेत घमंडी | Published: January 6, 2023 03:00 PM2023-01-06T15:00:56+5:302023-01-06T15:02:20+5:30

हेडफोन्स लावणाऱ्यांचे रस्ते अपघातात प्रमाण जास्त सेंट मेरीज शाळेचा ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शांती उत्सव

put on headphones prevent accidents avoid awareness of students in dombivli | हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती

हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती

googlenewsNext

डोंबिवली: हेडफोन्स घालून वाहन चालवणारे चालक, रस्त्यावर चालणारे, आणि रेल्वे प्रवासी यांच्या निष्काळजीपणामुळे होतात. त्यामुळे हेडफोनला घाला आळा अन अपघात टाळा, ध्वनिप्रदूषण रोखायला नो हॉर्न ओके प्लिज या विषयावर जनजागृती करण्यासाठी कल्याण पूर्वच्या सेंट मेरीज शाळेने हिराली फाउंडेशन, यंगीस्तान फाउंडेशन आणि कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. 

त्यानिमित्ताने एक हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहतूक पोलिसांनी अपघाताचे प्रमुख कारण सांगत अनावश्यक हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण टाळा, त्यामुळे प्रसंगी बहिरेपणा येऊ शकतो, अशा पद्धतीने जनजागृती करून नो हॉर्न ओके प्लिज अशी सगळ्यांनी शपथ घेतली. गरज नसताना हॉर्न वाजूवून डोके भंडावून सोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सेंट मेरी हायस्कूल कल्याण पूर्व च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे धडे दिल्याचे मुख्याध्यापक दिव्या बारसे यांनी सांगितले. 

कर्णकर्कश हॉर्न वाजवणे हे चांगले वर्तन नसून त्याद्वारे इतरांना त्रास देऊ नका असे आवाहन करण्यात आले. कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक मुलांनी हाती धरले होते. शाळेने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्ताने शांती वार्ता हा उपक्रम घेतल्याची माहिती शाळेच्या अनुपालन प्रमुख विंदा भुस्कुटे यांनी दिली. 

त्यावेळी व्यासपीठावर यंगिस्तान फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खानचंदानी, कोळशेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, हिराली संस्थेच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी, यंगिस्तान संस्थेचे संस्थापक आणि संयोजक मिथीलेश झा, आर्या ग्रुप शाळेचे संचालक भरत मलिक आदी उपस्थित होते. शांतिवार्ता उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना भुस्कुटे यांनी ध्वनी प्रदूषणाविषयी माहिती आणि मोलाचे मार्गदर्शन केले. ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या आपण सतर्कपणे आणि काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. 

कोळशेवाडी वाहतूक विभागाचे देशमुख यांनी सांगितले की, जेवढे रेल्वे ट्रॅक, कॅन्सरने मृत्यू होतात तितक्याच पटीने रस्ते अपघाती मृत्यू देखील होतात हे।गंभीर आहे. वाहनचालकाने वाहतूक विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांची माहिती करून दिली. खानचंदानी यांनी शाळेच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. हिरालीच्या सरिता खानचंदानी यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमाद्वारे फाउंडेशन आणि शाळा यांच्यामध्ये समन्वय साधला. 

मलिक यांनी फोन मुळे डोळ्यांचे, कानांचे किती मोठे नुकसान होते हे मुलांना पटवून दिले. येणाऱ्या पुढील समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या ही मोबाईलची असेल असे देखील त्यांनी वक्तव्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: put on headphones prevent accidents avoid awareness of students in dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.