'व्हॅलेंटाईन डे'निमित्त पॉजच्या माध्यमातून श्वानांना रेबीज लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:38 AM2022-02-14T11:38:36+5:302022-02-14T11:39:13+5:30
कुत्रा चावल्यानंतर आरोग्य सेवा मिळविण्यासंदर्भातील जागरुकतेची कमतरता दरवर्षी 55,000 हून अधिक लोकांचा बळी घेते.
डोंबिवली- व्हॅलेंटाईन डे निमित्त सोमवारी पॉजच्या माध्यमातून श्वानांना रेबीज लसीकरण करण्यात आले. कल्याण, उल्हासनगर आणि डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी उपक्रम राबवण्यात आला.
कुत्रा चावल्यानंतर आरोग्य सेवा मिळविण्यासंदर्भातील जागरुकतेची कमतरता दरवर्षी 55,000 हून अधिक लोकांचा बळी घेते. अशा घटना विशेषतः आशिया आणि आफ्रिकेत घडतात. रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 36% मृत्यू भारतात होतात. उपलब्ध माहितीनुसार, यामुळे दरवर्षी 18,000-20,000 मृत्यू होतात. भारतात नोंदवलेल्या रेबीज प्रकरणांपैकी सुमारे 30 ते 60% मृत्यू हे 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होतात.
योग्य वैद्यकीय सेवेद्वारे मानवातील रेबीज मृत्यू 100% टाळता येऊ शकतात. लोकांमध्ये रेबीज रोखण्यासाठी कुत्र्यांना लसीकरण करणे ही सर्वात किफायतशीर धोरण आहे. भारतातील पहिली ऑन साईट लसीकरण सेवा पॉज ने सुरू केली आणि याची दखल अमेरिकेतील पब्लिक रेडिओ ने 2012 मध्ये घेतली होती. गेले तीन दिवस, पॉज संस्थेच्या राज मारू, अभिषेक सिंग, ज्योती खोपकर आणि डॉ. पृथा ह्यांनी तो उपक्रम केला.