वेलंकनी दर्शनाकरीता जादा गाड्यांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदील
By अनिकेत घमंडी | Published: August 21, 2023 06:57 PM2023-08-21T18:57:03+5:302023-08-21T18:57:07+5:30
खासदार राजन विचारे यांच्या मागणीला यश
डोंबिवली: भारताच्या दक्षिणेकडील वेलंकनी नागापट्टनम या ठिकाणी २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत दरवर्षी वेलंकनी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या उत्सवासाठी संपूर्ण भारतातील ख्रिश्चन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. वेलंकनी येथे भाविकांना दर्शनासाठी जाण्याकरिता खासदार राजन विचारे यांनी २६ ऑगस्ट रोजी जाताना व परतीचा प्रवास ८ व ९ सप्टेंबर रोजी ट्रेन सुरु करावी अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. त्याला यश आले असून रेल्वे प्रशासन जादा गाड्या सोडणार असल्याचे विचारेंनी सोमवारी जाहीर।केले.
रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावर २६ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते वेलंकनी आणि परतीच्या प्रवासासाठी २८ ऑगस्ट व ८ सप्टेंबर रोजी वेलंकनी ते लोकमान्य टिळक टर्मिनस. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर २७ ऑगस्ट व दि. ७ सप्टेंबररोजी बांद्रा टर्मिनस ते वेलंकनी आणि परतीच्या प्रवासासाठी ३० ऑगस्ट व ९ सप्टेंबर रोजी वेलंकनी ते बांद्रा टर्मिनस अशा ट्रेन सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्र्यांचे व रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.