गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेचा ग्रीन सिग्नल, ४० अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 07:17 PM2021-08-05T19:17:16+5:302021-08-05T19:19:09+5:30

 श्रीगणेश उत्सव २०२१ साठी आधी घोषित केलेल्या ७२ उत्सव विशेष ट्रेन व्यतिरिक्त या विशेष ट्रेन असणार आहेत. त्यानुसार, गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :  

Railway green signal for Ganeshotsav, 40 additional special trains | गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेचा ग्रीन सिग्नल, ४० अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेचा ग्रीन सिग्नल, ४० अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार

Next
ठळक मुद्दे श्रीगणेश उत्सव २०२१ साठी आधी घोषित केलेल्या ७२ उत्सव विशेष ट्रेन व्यतिरिक्त या विशेष ट्रेन असणार आहेत. त्यानुसार, गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :  

डोंबिवली - श्रीगणेश उत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ४० अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार आहे.  श्रीगणेश उत्सव २०२१ साठी आधी घोषित केलेल्या ७२ उत्सव विशेष ट्रेन व्यतिरिक्त या विशेष ट्रेन असणार आहेत. त्यानुसार, गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
 
१. मुंबई- सावंतवाडी रोड विशेष (२ फे-या)  

01235 विशेष दि. ७.९.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १३.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता  पोहोचेल.
01236 विशेष दि.१०.९.२०२१ रोजी सावंतवाडी रोड येथून ०२.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ

२.  पनवेल- सावंतवाडी रोड विशेष (४ फेऱ्या) 
01237 विशेष दि. ८.९.२०२१ आणि ९.९.२०२१ रोजी पनवेल येथून  १४.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी  ०२.००  वाजता पोहोचेल. 
01238 विशेष दि. ८.९.२०२१ आणि ९.९.२०२१ रोजी सावंतवाडी रोड येथून ०२.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.

संरचना: 01235/01236 आणि 01237/01238 विशेष ट्रेनसाठी :  १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी. 

3. लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव विशेष (६ फेऱ्या) 
01239 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ५.९.२०२१, ७.९.२०२१ व ९.९.२०२१ रोजी ०५.३३ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.  
01240 विशेष मडगाव येथून दि. ५.९.२०२१, ७.९.२०२१ व ९.९.२०२१ रोजी २०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता  पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी. 

संरचना: २० द्वितीय आसन श्रेणी

4. लोकमान्य टिळक टर्मिनस- कुडाळ विशेष (६ फेऱ्या)  
01241 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ३.९.२०२१, ७.९.२०२१ व १०.९.२०२१ रोजी ००.४५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. 
01242 विशेष कुडाळ येथून दि. ५.९.२०२१, ८.९.२०२१ व १२.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग. 

संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, १८ द्वितीय आसन श्रेणी.

५. पनवेल-कुडाळ विशेष (६  फेऱ्या)  
01243 विशेष पनवेल येथून दि. ४.९.२०२१, ८.९.२०२१ व ११.९.२०२१ रोजी  ००.१५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता  पोहोचेल.  
01244 विशेष कुडाळ येथून दि. ३.९.२०२१, ७.९.२०२१ व १०.९.२०२१ रोजी  १२.१० वाजता  सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २३.१० वाजता पोहोचेल. 

थांबे: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग. 

संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, १८ द्वितीय आसन श्रेणी.

6. पनवेल- कुडाळ विशेष (४ फेऱ्या)  
01245 विशेष पनवेल येथून दि. ५.९.२०२१ आणि १२.९.२०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता  पोहोचेल.  
01246 विशेष कुडाळ येथून दि. ४.९.२०२१ आणि ११.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी  २३.०० वाजता पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग. 

संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, १८ द्वितीय आसन श्रेणी.

7. पुणे- मडगाव/करमळी- पुणे विशेष (२ फेऱ्या)  
01247 विशेष दि.८.९.२०२१ रोजी पुणे येथून १८.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल. 
 01248 विशेष करमळी येथून दि. १०.९.२०२१ रोजी १५.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५०  वाजता पोहोचेल. 

थांबे: लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी. 

संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
 

Web Title: Railway green signal for Ganeshotsav, 40 additional special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.