मोठी बातमी! कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा; इंद्रायणी एक्स्प्रेससह पुणे-नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा
By अनिकेत घमंडी | Published: September 6, 2022 07:50 AM2022-09-06T07:50:50+5:302022-09-06T07:51:18+5:30
कल्याण जवळील पत्रीपुलाजवळ ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगलवरी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली
डोंबिवली :
कल्याण जवळील पत्रिपुलाजवळ ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगलवरी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली, त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या.
एका लाईनमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला असून त्याने ट्रक फ्रॅक्चर असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली.
घटनास्थळी रेल्वेचे तांत्रिक विभागाचे कर्मचारी जाऊन त्यांनी ट्रॅक दुरुस्ती केली, आणि सकाळी ७.१५ च्या सुमारास वाहतूक सुरू झाली. त्यानंतर हळूहळू डाऊन जलद मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली असली तरी सकाळच्या या घोळामुळे प्रवाशांचे हाल।झाले. लांबपल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी ताटकळले, तसेच कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. तासभर गाड्यांना विलंब झाल्याने पुढचा सर्व प्रवास तसाच असल्याने अनेकांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरवले गेले.
लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्याचा परिणाम लोकल सेवेवरही झालेला पाहायला मिळत आहे. कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. रेल्वे गाड्या उशीरानं धावणार असल्या तरी लाइनमननं दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. त्यामुळे लाइनमनचेही कौतु केलं जात आहे.