Heart touching Story: माऊलीच ती! अवघ्या दहा दिवसांचे बाळ तळहातावर घेऊन उभी आहे साचलेल्या पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 06:53 PM2021-07-20T18:53:18+5:302021-07-20T18:54:54+5:30

Heart touching Story in Kalyan Rain water, flood: बाहेर मुसळधार पाऊस, घरात देखील पाणी आणि त्यातच घरात एक दहा दिवसाच बाळ (ten days old baby) असलं तर...हा विचार आपल्या मनात आला तर काळजात धस्स होईल.

Rain in Kalyan: Mother staying in flood water with 10 days old new born baby | Heart touching Story: माऊलीच ती! अवघ्या दहा दिवसांचे बाळ तळहातावर घेऊन उभी आहे साचलेल्या पाण्यात

Heart touching Story: माऊलीच ती! अवघ्या दहा दिवसांचे बाळ तळहातावर घेऊन उभी आहे साचलेल्या पाण्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : घरात पाणी शिरलंय.. घराभोवतीसुद्धा पाणी साचलय.. वस्तुंच नुकसान झालंय.. ही परिस्थिती आहे डोंबिवलीमधील अण्णानगर झोपडपट्टीमधील रहिवाशांची. मात्र, येथील एका घरातील दृश्य पाहिले तर तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.  बाहेर मुसळधार पाऊस, घरात देखील पाणी आणि त्यातच घरात एक दहा दिवसाच बाळ (ten days old baby) असलं तर...हा विचार आपल्या मनात आला तर काळजात धस्स होईल. मात्र, अण्णानगर झोपडपट्टी मधील एक माता आपल्या दहा दिवसाच्या बाळाला घेऊन पाण्यातच  रहात आहे. ही परिस्थिती विदारक असली तरी अगदी सत्य आहे. मात्र या परिस्थितीतही खचून न जाता चेहऱ्यावर हसू ठेवून ही ओली बाळांतीण धीराने  या परिस्थितीला सामोरं जाताना दिसत आहे. (Mother staying in flood water with 10 days old new born baby.)

रिटा राजेंद्र गोंड असे या महिलेच नाव आहे. गंभीर स्थितीत सुद्धा ही महिला केवळ आपल्या बाळाचे हास्य पाहुन मोठ्या धीराने परिस्थितीशीची दोन हात करत आहे. खरं तर  मूलं जन्माला आलं की त्याच कौतुक केलं जातं.घर सजवलं जात.. तसेच आजूबाजुचा परिसर देखील स्वच्छ ठेवला जातो. मातेचीही पुरेपूर काळजी घेतली जाते. मात्र, या परिसरात पाणी साचल्यानं माता आणि बाळ दोघांचेही हाल होतायेत..दहा दिवसाच बाळ घेऊन ही महिला कसेबसे या साचलेल्या पाण्यात  दिवस काढतेय. 

अण्णानगर परिसर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येतो मात्र या परिसराच सर्वेक्षण मध्य रेल्वे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनातर्फे करून सुद्धा येथील नागरिकांचे सोय कोणत्याच प्रशासनाने केलेली नाही अस येथील नागरिकांच म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसानं अधिक जोर धरला तर  येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Rain in Kalyan: Mother staying in flood water with 10 days old new born baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.