अंबरनाथमध्ये राम जन्मोत्सव उत्साहात; आळंदीतल महाराजांचा किर्तन सोहळा
By पंकज पाटील | Published: March 30, 2023 05:52 PM2023-03-30T17:52:25+5:302023-03-30T17:54:30+5:30
राम जन्मोत्सवाचे आयोजक नगरसेवक प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील मिलिंद पाटील, सुदाम रसाळ, आणि शाम रसाळ यांच्या पुढाकाराने हा सोहळा यशस्वी करण्यात आला.
अंबरनाथ : अंबरनाथ शहरांमध्ये आज राम जन्मोत्सव मोठा उत्साह साजरा करण्यात आला. अंबरनाथच्या कोहोजगाव मधील राम मंदिरात हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. शहरातील सर्वात जुने राम मंदिर असलेल्या कोहजगावमध्ये आज राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राम नवमी निमित्त मंदिरात तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांच आयोजन केले जाते. यंदा देखील हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. राम मंदिराच्या प्रांगणात आळंदीचे महाराज विष्णू देठे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुपारी बारा वाजता कीर्तनाचा समारोप करून राम जन्मोत्सव मंदिरात साजरा करण्यात आला. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं.
राम जन्मोत्सवाचे आयोजक नगरसेवक प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील मिलिंद पाटील, सुदाम रसाळ, आणि शाम रसाळ यांच्या पुढाकाराने हा सोहळा यशस्वी करण्यात आला. या राम जन्मोत्सवासाठी आमदार किसन कथोरे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, भाजपाचे युवा नेते विश्वजीत कारंजुले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून राम मंदिरात दर्शन घेतले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आल होत. तब्बल दहा हजाराहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे शहराध्यक्ष अभिजीत करंजुले यांच्या वतीने रामनवमी जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून कीर्तन भजन असे विविध कार्यक्रमांचा देखील आयोजन करण्यात आके होते. भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते दुपारची महाआरती करण्यात आली. यावेळी नागरिकांसह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथ शहरातील गणपतीचं जुने आणि जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या हेरंब मंदिरात आज राम जन्म सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी राम जन्मासाठी मोठी गर्दी केली होती. हेरंब मंदिरात दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी राम जन्म सोहळा पार पडला.त्यापूर्वी मंदिरात कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.