भाजप पदाधिकऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा; पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप 

By प्रशांत माने | Published: May 31, 2023 07:21 PM2023-05-31T19:21:15+5:302023-05-31T19:21:31+5:30

विनयभंग गुन्ह्याच्या विरोधात भाजपच्या वतीने गुरूवारी सकाळी ११ वाजता आंदोलन छेडण्यात येणार आहे.

Rape case against BJP office bearer Accused of demanding physical pleasure from wife of police officer | भाजप पदाधिकऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा; पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप 

भाजप पदाधिकऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा; पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप 

googlenewsNext

डोंबिवली : भाजपचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे. पिडीत महिला ही एका पोलिस अधिकाऱ्याची पत्नी आहे. दरम्यान जोशी यांनी विनयभंगाचा आरोप फेटाळला असून विनयभंग गुन्ह्याच्या विरोधात भाजपच्या वतीने गुरूवारी सकाळी ११ वाजता आंदोलन छेडण्यात येणार आहे.

पिडीत महिलेचे पती पोलिस अधिकारी आहेत. दोघांमध्ये वाद सुरू आहे. पोलिस अधिकारी हे जोशी यांचे मित्र आहेत. दरम्यान घर खाली कर, माझे सोबत शारीरीक संबंध ठेव अशा धमक्या देवुन शारीरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप पिडीत महिलेने जोशी यांच्यावर केला आहे. २०१८ ते एप्रिल २०२३ दरम्यान हा प्रकार घडल्याचे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे. तीच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात विनयभंग आणि धमकावणे आदि गुन्हयाखाली जोशीं विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. जोशी हे भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष आहेत.

माझा काहीही संबंध नाही
मी त्या महिलेला कधीही भेटलेलो नाही. तीला कधी कॉल देखील केलेला नाही. तीचे पती पोलिस अधिकारी आहेत. ते माझे मित्र आहेत. त्या दोघांमध्ये वाद सुरू आहेत. मी पतीला मदत करतो असे तीला वाटते. पण माझा काहीही संबंध नाही. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले आहेत - नंदु जोशी भाजप पदाधिकारी डोंबिवली. 
 

Web Title: Rape case against BJP office bearer Accused of demanding physical pleasure from wife of police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.