कल्याणात आढळला दुर्मिळ कवड्या सर्प
By प्रशांत माने | Published: July 19, 2024 07:12 PM2024-07-19T19:12:38+5:302024-07-19T19:12:57+5:30
सर्पमित्र सतीश बोबडे व पार्थ पाठारे यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुखरूपपणे रेस्क्यू केले.
कल्याण: पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका कपडयाच्या दुकानात साप शिरल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. लागलीच यांची माहिती वॉर फाऊंडेशनला देण्यात आली. सर्पमित्र सतीश बोबडे व पार्थ पाठारे यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुखरूपपणे रेस्क्यू केले.
दुकानात शिरलेला साप हा अत्यंत दुर्मिळ असा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या सर्प होता. पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या हा कल्याणमध्ये प्रथमच आढळला आहे. या सापाच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत वरील भागास रांगेत पिवळे ठिपके असतात म्हणून याला मराठी मध्ये पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या असे म्हणतात. हा साप पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे या सापापासून मानवाला कुठलाही धोका नाही. बचाव केला गेलेला साप लवकरच वनविभागाच्या परवानगीने निसर्ग मुक्त करण्यात येईल अशी माहिती वॉर फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली.