शासन काही करेल यापेक्षा प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपून कार्य करायला हवे : तुकाराम मुंढे
By अनिकेत घमंडी | Published: January 15, 2024 04:20 PM2024-01-15T16:20:50+5:302024-01-15T16:21:15+5:30
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे व्होकेशनल एकलन्स सोहळा।संपन्न शहरातल्या विविध गटातील मान्यवरांचा।सत्कार
डोंबिवली: प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरतांना सार्वजनिक भान ठेवून काम करावे. प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असेल की त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात काम करत असतांना समाजात पण एक भावनेने काम करावे. केवळ फक्त आपल्या साठी न बघता आणि शासन काही करेल ह्या वर विसंबून न राहता प्रत्येकाने आपल्या कृतीतून समाजासाठी काम केले पाहिजे असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे व्होकेशनल एकलन्स ह्या रोटरीचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हे रोटरी भवन येथे करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंढे उपस्थित होते.
विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या तीन व्यक्तींचा ज्या मध्ये अपूर्वा पालव हिचा महिला शरीर सौष्ठव, निहार केळकर यास बॅडमिंटन , अजित करकरे यांना शैक्षणिक कार्य तसेच सामाजिक आणि विविध कार्यात अग्रेसर असणाऱ्या टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्या संस्थेचा रोटरी तर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे ह्या पुरस्काराचे स्वरूप होते. मुंढे हे पहिल्यांदाच डोंबिवली मध्ये आले होते आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट ह्या संस्थेच्या कामाची त्यांनी स्तुती केली. त्यावेळी क्लबचे अध्यक्ष रघुनाथ लोटे, सचिव डॉ महेश पाटील, मुंढे यांचे अनेक स्नेही आदींसह मान्यवर उपस्थित होते.