कल्याणमधील रेल्वेच्या जागेवरील नागरिकांचे पुनर्वसन करा; माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली दानवेंची भेट

By अनिकेत घमंडी | Published: September 24, 2022 03:35 PM2022-09-24T15:35:27+5:302022-09-24T15:36:53+5:30

याच बरोबर, त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे उड्डाणपूलाच्या मार्गाच्या गर्डर कामाकरिता रेल्वे सुरक्षा परवानगीही मागण्यात आली. कल्याण ते नाशिक रोड व कल्याण ते पुणे मेमू रेल्वे कार्यान्वित करण्याची मागणीही केली.

Rehabilitate the citizens on the railway site in Kalyan Former MLA Narendra Pawar visited Danven | कल्याणमधील रेल्वेच्या जागेवरील नागरिकांचे पुनर्वसन करा; माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली दानवेंची भेट

कल्याणमधील रेल्वेच्या जागेवरील नागरिकांचे पुनर्वसन करा; माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली दानवेंची भेट

Next


डोंबिवली : कल्याण व पालघर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मुंबई येथील सह्याद्री विश्रामगृहात शनिवारी भेट घेऊन चर्चा केली. वाशिंद शहर पूर्व पश्चिम रेल्वे पादचारी पुलाचे काम रेल्वे विभागाने मंजूर केले आहे, मात्र कामाची सुरुवात झाली नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे, त्या विषयात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदरचे बांधकाम गतीने सुरू करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. 

याच बरोबर, त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे उड्डाणपूलाच्या मार्गाच्या गर्डर कामाकरिता रेल्वे सुरक्षा परवानगीही मागण्यात आली. कल्याण ते नाशिक रोड व कल्याण ते पुणे मेमू रेल्वे कार्यान्वित करण्याची मागणीही केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या या ठिकाणावर रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या, तथापि यामुळे अनेक शेतकरी आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे, सध्या कोरोना पूर्णतः आटोक्यात आला असल्याने सदरच्या गाड्या कार्यान्वित करण्याची मागणीही त्यांनी केली. 

कल्याण पूर्व येथील रेल्वेच्या जमिनीवरील अनेक कुटुंबांना घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत मात्र ती कुटुंबे गेली ४० वर्षे त्या ठिकाणी राहत आहेत, त्यांना अचानक बेघर करण्याऐवजी त्यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वे विभाग आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची बैठक लावण्याची मागणी त्यांनी केली. या सर्व विषयांवर तातडीने मार्ग काढत सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दानवे पाटील यांनी दिले असल्याचे पवार म्हणाले.

Web Title: Rehabilitate the citizens on the railway site in Kalyan Former MLA Narendra Pawar visited Danven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.