डोंबिवलीकरांना MIDC कडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातून दिलासा; MIDC ला पाणी पुरवठा प्रेशर वाढविण्याचे आदेश

By मुरलीधर भवार | Published: February 29, 2024 11:45 AM2024-02-29T11:45:38+5:302024-02-29T11:46:07+5:30

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ  या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे.

Relief from MIDC water supply to Dombivlikars | डोंबिवलीकरांना MIDC कडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातून दिलासा; MIDC ला पाणी पुरवठा प्रेशर वाढविण्याचे आदेश

डोंबिवलीकरांना MIDC कडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातून दिलासा; MIDC ला पाणी पुरवठा प्रेशर वाढविण्याचे आदेश

कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ  या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे. पाण्याची ही समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांच्या पुढाकाराने काल मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली असून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात विशेषतः नांदिवली टेकडी परिसर, भोपर, देसलेपाडा, सोनारपाडा, दावडी,पिसवली ह्या भागांमध्ये मागील काही महिन्यात अधिक दाबाने पाणी येत होते. मात्र आता सध्या परिस्थितीत कमी झाले आहे. त्यामेळे ह्या पट्यात नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे, याबाबत अत्यंत तातडीने निर्णय घेऊन ह्या भागांना MIDC कडून महानगरपालिकेला होणारा पाणी पुरवठा संपूर्ण दाबाने सोडण्यात यावा असे आदेशीत करण्यात आले आहे…

- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एमआयडीसीच्या माध्यमातून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी एमआयडीसी एक ठरावीक रक्कम आकारते. ही थकबाकीची रक्कम गेल्या काही वर्षात ६० कोटी इतकी होती. मात्र ही रक्कम पालिकेने न भरल्याने त्यावर तब्बल २३० कोटींची व्याजाची रक्कम झाली होती. ही व्याजाची रक्कम पूर्ण माफ करण्यात आली.

- तर ६० कोटी रुपये येत्या पाच ते सहा वर्षात प्रशासनाला टप्प्याटप्प्याने भरावे लागणार आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

- पलावा लोधा गृह संकुलात राहणाऱ्या रहिवाशांना पाण्यासाठी व्यवसायिक दर लागू करण्याऐवजी निवासी दर लागू करण्यात येणार आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेने कार्यवाही करावी

- यांसह सर्व शहरातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्तरीत्या काम करावे. अशा सर्व सूचना आणि निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजू पाटील, यांच्यासह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड , एमआयडीसीचे सीईओ बिपिन कुमार शर्मा तसेच सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याच बरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे, युवासना राज्य सचिव दीपेश म्हात्रे,उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुका प्रमुख महेश पाटील,माजी नगरसेवक गजानन पाटील,रवी म्हात्रे,विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, विकास देसले,आकाश देसले,विलास भोईर युवासेना शहर अधिकारी सागर जेधे व नांदिवली टेकडी परिसर सोसायटी मधील नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Relief from MIDC water supply to Dombivlikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.