महावितरणच्या डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक चार व अंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर
By अनिकेत घमंडी | Updated: June 19, 2024 16:56 IST2024-06-19T16:56:12+5:302024-06-19T16:56:51+5:30
उपविभाग चारसह गांधीनगर पश्चिम, कोपर रोड, जुनी डोंबिवली या तीन शाखा कार्यालयांचा यात समावेश असून २१जून पासून ते सुरू होतील.

महावितरणच्या डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक चार व अंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर
डोंबिवली: महावितरणच्याडोंबिवली विभाग कार्यालयांतर्गत डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक चार व त्यांतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत करण्यात आले. उपविभाग चारसह गांधीनगर पश्चिम, कोपर रोड, जुनी डोंबिवली या तीन शाखा कार्यालयांचा यात समावेश असून २१जून पासून ते सुरू होतील.
गणेश मंदिरामागे, पंडित दिनदयाल रोड, कैलास भुवन बिल्डींग जवळ, डोंबिवली पश्चिम या नवीन पत्त्यावर शुक्रवारपासून ही चारही कार्यालये कार्यान्वित होत आहेत. सध्या ही कार्यालये नाखे एव्हरेस्ट हाऊस, हॉटेल द्वारकाच्या वर, तीसरा मजला, रेल्वेस्टेशन जवळ, डोंबिवली पश्चिम येथे भाडयाच्या जागेत कार्यरत आहेत. संबधित ग्राहकांनी या नवीन बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. पूर्वेला बाजीप्रभू चौक येथे आणि एमआयडीसी मध्ये कावेरी चौकाजवळ महावितरणचे कार्यालय असून तेथे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.