स्कायवॉकच्या डागडुजीला मिळाला मुहूर्त; तुटलेल्या लाद्यांच्या ठिकाणी सिमेंटचा मुलामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:05 PM2021-02-26T23:05:13+5:302021-02-26T23:05:25+5:30

तुटलेल्या लाद्यांच्या ठिकाणी सिमेंटचा मुलामा

The repair of the skywalk got the moment | स्कायवॉकच्या डागडुजीला मिळाला मुहूर्त; तुटलेल्या लाद्यांच्या ठिकाणी सिमेंटचा मुलामा

स्कायवॉकच्या डागडुजीला मिळाला मुहूर्त; तुटलेल्या लाद्यांच्या ठिकाणी सिमेंटचा मुलामा

Next

कल्याण : येथील स्कायवॉकच्या तळाला असलेले फायबरचे पत्रे कोसळण्याच्या घटना अधूनमधून सुरू असताना स्कायवॉकच्या डागडुजीला केडीएमसीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तुटलेले रेलिंग, गायब झालेले संरक्षक बार आणि तुटलेल्या लाद्या यामुळे स्कायवॉक धोकादायक झाला असताना दुसरीकडे लाद्यांअभावी पडलेले खड्डे सिमेंटने भरण्यास सुरुवात केली आहे. लवकरच अन्य बाबींकडेही लक्ष घालण्याची मागणी पादचाऱ्यांकडून केली जात आहे.

रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यातून सुटका करण्याच्या अनुषंगाने २०१०-२०११ मध्ये पश्चिमेकडील भागात स्कायवॉकची उभारणी केली गेली. नोव्हेंबर २०१४ मध्ये स्कायवॉक एमएमआरडीएकडून केडीएमसीला हस्तांतरित करण्यात आला. तेव्हापासून स्कायवॉकची देखभाल दुरुस्ती करणे, फेरीवाले, गदुर्ल्ले, भिकारी यांच्या उपद्रवास आळा घालून स्कायवॉक पूर्णपणे पादचाऱ्यांकरिता खुला ठेवणे याची जबाबदारी केडीएमसीची आहे. 

परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने फेरीवाले आणि भिकाऱ्यांचे अतिक्रमण जैसे थे आहे. त्यात प्रवाशांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप दिलाची घटना गुरुवारी रात्री घडली. केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याने रेलिंग तुटलेल्या स्कायवॉकवरून पडून बबलू तलर हा दृष्टीहीन पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना मे २०१८ मध्ये घडली होती.  या घटनेनंतरही केडीएमसीला जाग आलेली नव्हती. त्यामुळे अपघाताचा धोका कायम होता. अखेर उशिरा का होईना, जाग आलेल्या केडीएमसीने तुटलेल्या लाद्यांच्या ठिकाणी सिमेंट भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

Web Title: The repair of the skywalk got the moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण