एमआयडीसी कार्यालयावर पाण्यासाठी रहिवाशांची धडक
By अनिकेत घमंडी | Published: February 6, 2024 04:51 PM2024-02-06T16:51:05+5:302024-02-06T16:51:27+5:30
मंगळवारी निवासी भागातील रहिवाशांनी एमआयडीसी वर धडक मारून पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता आनंद गोगटे यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्यापुढे विविध तक्रारींचा पाढा वाचला.
डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी विभागाच्या परिसरात गेले काही महिने अत्यन्त कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. विशेष उस्मा पेट्रोल पंप समोरील घरांना पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने येत होता. अनेकदा त्याबाबतीत तक्रारी करून ही एमआयडीसी कडून दखल घेतली जात नव्हती.
मंगळवारी निवासी भागातील रहिवाशांनी एमआयडीसी वर धडक मारून पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता आनंद गोगटे यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्यापुढे विविध तक्रारींचा पाढा वाचला. त्यांना रहिवाशांतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी सदर प्रश्न दोन दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले असून त्यांनी रहिवाशांचा मागणी नुसार ताबडतोब दोन सहाय्यक अभियंता यांना रहिवाशांसोबत प्रत्यक्ष जागेवर पाठवून पाहणी करून येण्यास सांगितले आहे. त्यावेळी रहिवाशांकडून मिलिंद जोशी, संजय गोगटे, प्रिया दामले, अरविंद टिकेकर, राजु नलावडे, भालचंद्र म्हात्रे, सागर पाटील, राजीव देशपांडे, ऋतुजा केतकर, अश्विनी पेंडसे, भारती मराठे, कानिका गद्रे, उदय प्रभुदेसाई, डॉ. मंजुषा पवार, प्रकाश खरे, डॉ. मनोहर अकोले, महेश साटम, राजेश कोलापटे, चंद्रशेखर देव, मुकुंद साबळे हे रहिवाशी उपस्थित होते.