मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे, राज ठाकरेंशी झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 01:46 AM2021-02-01T01:46:08+5:302021-02-01T01:46:41+5:30

MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने जाहीर केलेल्या नियुक्त्यांवरून उद्भवलेल्या वादात पूर्वेतील ३२० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे उपशहराध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे सादर केले होते.

the resignation of MNS party workers is Back, discussions were held with Raj Thackeray | मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे, राज ठाकरेंशी झाली चर्चा

मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे, राज ठाकरेंशी झाली चर्चा

Next

कल्याण - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने जाहीर केलेल्या नियुक्त्यांवरून उद्भवलेल्या वादात पूर्वेतील ३२० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे उपशहराध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे सादर केले होते. पण, आमदार प्रमोद (राजू) पाटील आणि जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी केलेली मध्यस्थी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घेतले आहेत. 

पक्ष सोडून जाणाऱ्यांना व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पक्षात येणाऱ्यांना मोठी मानाची पदे दिली गेल्याने कल्याण पूर्वेतील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यात तब्बल ३२० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देणाऱ्यांत उपशहराध्यक्ष, विभागीय संघटक, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्षांसह गट अध्यक्षांचा समावेश होता. मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि त्यांची नुकतीच कल्याण पूर्व विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य एकाच्या झालेल्या नियुक्तीवरूनही नाराजी उफाळून आली होती. यातूनच पक्षात राजीनामा सत्र सुरु झाले होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना, मनसेत राजीनाम्यांच्या भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाली होती. पक्षस्तरावर हा विषय गंभीरपणे घेण्यात येऊन यावर लगेचच मार्ग काढण्यात आला. 

गैरसमज झाले दूर
उपशहराध्यक्ष संतोष राठोड यांच्याकडे सादर केलेले राजीनामे गेल्या सोमवारी मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्याकडे दिले जाणार होते. पण आमदार पाटील यांनी चर्चेसाठी बोलावल्याने राजीनामा सादर करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. त्यात शुक्रवारी नाराजी प्रकरणाची दखल घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेअंती राजीनामे मागे घेण्यात आले. ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आमचे गैरसमज दूर झाले असून आम्ही आमचे राजीनामे मागे घेत असल्याची माहिती उपशहराध्यक्ष राठोड यांनी दिली.

Web Title: the resignation of MNS party workers is Back, discussions were held with Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.