अतिधोकादायक इलेक्ट्रिक पोलमुळे दुर्घटना होण्याची शक्यता, महावितरणचे दुर्लक्ष
By अनिकेत घमंडी | Updated: October 2, 2023 14:59 IST2023-10-02T14:58:48+5:302023-10-02T14:59:14+5:30
बऱ्याच वर्षापूर्वी या पोलवरून जवळच्या इमारतींना वीज पुरवठा केला जात होता.

अतिधोकादायक इलेक्ट्रिक पोलमुळे दुर्घटना होण्याची शक्यता, महावितरणचे दुर्लक्ष
डोंबिवली: एमआयडीसी निवासी मधील मिलापनगरमधील RL -79 बंगलो लागून एक जुना इलेक्ट्रिक खांब उभा आहे. त्या खांबावरून कुठलाही विद्युत पुरवठा दिला जात नाही आणि विद्युत वाहिन्या जोडल्या नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणचा हा पोल विनावापर पडून आहे.
बऱ्याच वर्षापूर्वी या पोलवरून जवळच्या इमारतींना वीज पुरवठा केला जात होता. आता हा पोल गंजल्याने व भोके पडल्याने केव्हाही पडू शकतो आणि अपघात होऊ शकतो, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. हा लोखंडी पोल जर बाजूच्या बंगल्यावर किंवा रस्त्यावर पडला तर कोणाच्यातरी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मोठे नुकसान होऊ शकते. याबाबतीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून लवकरच कार्यवाही अशी अपेक्षा येथील रहिवासी व्यक्त करीत आहे.
या अतिधोकादायक पोल लागून जे येथील बंगले आहेत. या बंगल्यांमध्ये वरिष्ठ नागरिक असून ते अशा धोकादायक परिस्थितीत राहत आहेत. ज्येष्ठ वकील श्रीकांत गडकरी हे त्या ठिकाणाहून जवळच राहत आहेत. त्यांनी तो धोकादायक खांब त्वरित तेथून काढून घ्यावा, अशी विनंती केली असल्याचे दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले.