रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट २० कुपोषित बालकांना पुरवणार पोषण आहार

By अनिकेत घमंडी | Published: November 4, 2023 05:10 PM2023-11-04T17:10:53+5:302023-11-04T17:11:32+5:30

शासनासमवेत केली अंगणवाडी बालकांच्या आरोग्याची तपासणी

Rotary Club of Dombivli East to provide nutritional food to 20 malnourished children | रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट २० कुपोषित बालकांना पुरवणार पोषण आहार

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट २० कुपोषित बालकांना पुरवणार पोषण आहार

अनिकेत घमंडी/ डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा विभाग महिला आणि बालक कल्याण ह्यांच्या संयुक्त विद्यमाने, शुक्रवारी कुपोषण निर्मूलन या उपक्रम अंतर्गत पोषण आरोग्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमांतर्गत उपचारासाठी, अतिकुपोषित अशा २० बालकांची निवड करण्यात आली. सुमारे ५४ बालकांमध्ये दंतविषयक समस्या आढळल्या. १० बालकांमध्ये डोळ्यांच्या वक्रीभवनाशी संबंधित दोष आढळून आले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ लोटे ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे उदघाटन करुन कार्यक्रमाचे स्वरुप आणि उद्दिष्टांबाबत माहिती दिली. आंगण वाडी- ४, ठाकूर वाडी, सावंत हॉस्पिटल जवळ, डोंबिवली पश्चिम याअंगणवाडित ती मुले आहेत.

त्यावेळी शासनातर्फे उपायुक्त आनंद खंडागळे आणि निरीक्षक विजया काटे ह्यांनी योग्य त्या अंगणवाडी निवडण्याच्या कामी सहाय्य केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे ह्या कार्यक्रमासाठी जो वैद्यकीय चमू कार्यरत होता. त्यात डॉ. अमेय काकिर्डे, बालरोगतज्ज्ञ,डॉ. महेश पाटील, आहारतज्ज्ञ, डॉ. भक्ती लोटे, आरोग्यतज्ज्ञ, डॉ. हेमिश जोशी आणि डॉ. तृप्ती कोठारी - दंतवैद्य , डॉ. अनघा हेरुर ह्या तज्ञांसह हेरुर यांच्या रुग्णालयातील कर्मचारी, नेत्रचिकित्सा असे कार्यक्रमाचे एकूण ७४ लाभार्थी होते. त्यासाठी वयोगट - ६ महिने ते ५ वर्षे असा मर्यादित ठरवला होता, कुपोषण निर्मूलन आरसीडीई पोषण प्रकल्प -चरण १ कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उपरोक्त कुपोषित बालकांना पौष्टिक खाद्य पुरवण्याची व्यवस्था करण्यात येईल, आणि त्यापाठोपाठ, तिसऱ्या चरणात, संबंधित बालकांच्या प्रगतीवर पुढील ३ महिने देखरेख ठेवण्यात येईल. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे संबंधित बालकांना नेहमीच आवश्यक ते सहाय्य पुरवण्यात येते - ज्याच्या परिणामस्वरुपी, गतवर्षात सुमारे ३२ कुपोषित बालकांना मदत करुन परिस्थिती सुधारण्यास मदत झाल्याची माहिती रोटेरियन मानस पिंगळे यांनी शनिवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Web Title: Rotary Club of Dombivli East to provide nutritional food to 20 malnourished children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण