रोटरी स्वरसंध्या मोठ्या उत्साहात संपन्न
By अनिकेत घमंडी | Published: February 26, 2024 12:14 PM2024-02-26T12:14:07+5:302024-02-26T12:15:20+5:30
सुमधुर गाण्यांची मैफिल रविवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली पूर्व येथे उत्साहात संपन्न झाली.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: रोटरी विकास ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आयोजित, स्वरमैफिल प्रस्तुत "रोटरी स्वरसंध्या " सुमधुर गाण्यांची मैफिल रविवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली पूर्व येथे उत्साहात संपन्न झाली.
विख्यात पार्श्वगायिका बेला शेंडे यांनी अप्सरा आली, वाजले की बारा,ओल्या सांजवेळी तर ऋषिकेश रानडे यांनी महान पार्श्वगायक स्व.मोहम्मद रफी यांचे चौदवी की चांद हो या आफताब हो,कधी तू रिमझिम, ऐसे लेहराके तू कव्वाली अशी सदाबहार गाणी सादर केली. व्हॉईस ऑफ किशोर कुमार गायक अलोक काटदरे यांनी चाहिए थोडा प्यार,बॉलिवुडचा पहिला सुपरस्टार स्व. राजेश खन्ना यांचे "चिंगारी कोई भडके", "कूच तो लोग कहेंगे " व बॉलिवुडचा शेहंशहा महानायक अमिताभ बच्चन यांचे छु कर मेरे मन को, नीले नीले अंबर पर, एक चतुर नार बडी होशियार तर व्हॉईस ऑफ अमिताभ बच्चन व सुदेश भोसले फेमगायक प्रमोद तळवडेकर व गायिका अमृता दहिवलेकर यांनी 'ये काहा आगाये' हम यारखी एका पेक्षा एक गीते सादर केली. यावेळी उपस्थित रसिक प्रेक्षकांनी गाणी नृत्य व टाळ्या यावर एकच ठेका धरला होता. सदर स्वरसंध्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परेश दाभोळकर यांनी केले.
रोटरी बालोद्यान संवर्धन व विविध सामाजिक उपक्रम राबविण्याकरिता निधी संकलित करण्यात येणार आहे असे रो.माधव चिकोडी यांनी यावेळी सांगितले.
त्यावेळी रो.डॉ. उल्हास कोल्हटकर, रो. रघुनाथ लोटे - अध्यक्ष, रो. डॉ. महेश पाटील (मानद सचिव) पूर्व अध्यक्ष रो. विकास सनकुलकर - प्रकल्प संचालक
पूर्व अध्यक्ष रो.माधव चिकोडी मानद सचिव रोटरी विकास ट्रस्ट,यांच्या सह रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्ट चे सर्व सभासद व डोंबिवलीकर रसिक प्रेक्षक उपस्थित होते.