कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दोन मद्यपीचा धिंगाणा

By मुरलीधर भवार | Published: March 25, 2024 09:36 PM2024-03-25T21:36:55+5:302024-03-25T21:37:21+5:30

दुचाकी चालक मी मुंडेंचा नातेवाईक आहे. पत्रकार आहे असे सांगत हा धिंगाणा घातला.

Rukminibai hospital of Kalyan, two drunkards | कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दोन मद्यपीचा धिंगाणा

कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दोन मद्यपीचा धिंगाणा

कल्याण- आज रंगपंचमीनिमित्त तळीरामांची चांगलीच चंगळ झाल्याचे पाहायला मिळाले.अखेर सायंकाळी रंगांचा बेरंग झाला. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या वाळधुनी पुलावर एका बाईकवरून एक इसम पडला. त्याला ट्राफिक वॉर्डन ने त्याला उचलून उपचारासाठी रुग्णालयात आणले . त्याच्या पाठोपाठ दुचाकीस्वार देखील तिकडे दाखल झाला. दोघांनी उपचार नको आम्हाला जाऊ द्या असे सांगत रुग्णालयात जवळपास अर्धा ते पाऊण तास धिंगाणा घातला.

दुचाकी चालक मी मुंडेंचा नातेवाईक आहे. पत्रकार आहे असे सांगत हा धिंगाणा घातला. त्याने ट्राफिक वॉर्डन सह पोलिसांनी सोबत देखील अरेरावी केली. त्यांचा अवतार बघून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने दोघांना पुन्हा गाडीवर बसून घरी जाण्याची परवानगी दिली . या दोघांना सहजासहजी सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले..मद्यपी दोघेही रुग्णालयातून बाहेर पडले काही अंतरावर जात नाही तोच पुन्हा त्यांच्या गाडीला अपघात झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी रक्तबंबाळ अवस्थेत या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयात पुन्हा या दोघांनी धिंगाणा घालण्यात सुरुवात केली होती. त्यांच्याकडून उपचार घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांनी उपचार घेण्यास भाग पाडले. तरी ते उपचार करणाऱ््यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांची तराट रंगपंचमी पोलिस, रुग्णलायाचे कर्मचारी यांना चांगलीच भोवली.

Web Title: Rukminibai hospital of Kalyan, two drunkards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.