कल्याणमंध्ये समता संघर्ष सांस्कृतिक मंचचे रंगले कवी संमेलन
By सचिन सागरे | Published: March 13, 2024 12:46 PM2024-03-13T12:46:07+5:302024-03-13T12:46:22+5:30
ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर वसईकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर प्रस्ताविक समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी मांडले.
कल्याण : तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी समता संघर्ष सांस्कृतिक मंच (ठाणे-मुंबई) यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खुले कवी संमेलन कल्याण येथे घेण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर वसईकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर प्रस्ताविक समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी मांडले.
यावेळी, ज्येष्ठ कवी शाम भालेराव, जगदेव भटू,मिलिंद जाधव, अक्षय भोईर, सुरेखा पैठणे, रोहीत जाधव, दुहिता जाधव, किशोर उजगरे, विजय येडे, प्रीती माने, कैलास म्हस्के, जितरत्न जाधव, संजीवकुमार शिंदे यांनी विविध विषयांवर कविता सादर करत प्रबोधन केले. तर नाट्य कलाकार कोमल खामकर व सायली पावसकर यांनी लोककला सादर केली.
यावेळी समता संघर्ष संघटन अध्यक्ष शैलेश दोंदे, समता संघर्ष संघटनचे उपाध्यक्ष सदानंद गायकवाड, गणेश सोष्टे, गौतम जाधव, अविनाश दोंदे, ऍड.श्रीकांत कांबळे, ऍड. दिलीप वाळंज, रविंद्र गायकवाड, कृष्णा गायकवाड, राजेश देवरुकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा पैठणे यांनी केले.